Breaking

Post Top Ad

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

'आर्णीच्या तहसीलदारांना न्यायालयाची नोटीस'

'आर्णीच्या तहसीलदारांना न्यायालयाची नोटीस'
महाराष्ट्र24 । आर्णी : अवैध रेती उत्खनन प्रकरणी दोघांनी नायब तहसीलदार सोबत हुज्जत घातल्या प्रकरणी आर्णी पोलीसात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासह विविध कलमानुसार बोरगांव येथील दोघा भावा विरोधात गुन्हा दाखल झाला.मात्र पोलीसांनी आरोपींना अटक न केल्याने तहसीलदार साहेबांचा पारा भडकला आणि साहेबांनी कारवाईचा हत्यार उपसत कलम १२२ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून थेट दोघांना कारागृहात पाठविले.दरम्यान घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरली.एका विधीतज्ञाने तहसीलदार महोदयांना भेटून साहेब हे चुकीचे होत आहे असे त्यांच्या लक्षात आणुन दिले.मात्र साहेब काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

अभ्यासू तहसीलदार महोदय चुकले इथे?

एखाद्या व्यक्तीवर कलम १०७ ची कारवाई करतांना तहसीलदार (तालुकादंडधिकारी) समोर उभ केल्या जातं.जामीन देताना सदर व्यक्ती कडून पुन्हा कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्या जाते.प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतर सहा महिन्यात सदर व्यक्तीकडून कायद्याचा उल्लंघन झाल्यास नंतर त्या व्यक्तीवर तालुकादंडधिकारी म्हणुन कलम १२२ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची थेट कारागृहात रवानगी करण्याचे आदेश पोलीसांना देण्याचे कायद्यात तसे तरतूद आहेत.मात्र अभ्यासू तहसीलदार महोदय यांनी ना तर आधी सदर व्यक्तींना जामीन दिला. ना तर त्यांच्या कडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं.थेट कारवाई करून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.हे तर अन्याय आहेत, 'अध्यक्ष महोदय' मोबाईल युगात कायदा ऑनलाईन असल्याने अनेकांना कायदा समजून घेतात.त्यामुळे येत्या दोन सप्टेंबर नंतर तहसीलदार साहेबांच्या अडचणीत भर पडणार हे मात्र तेवढेच खरे आहेत.

'आर्णीच्या तहसीलदारांना न्यायालयाची नोटीस'

आर्णी तहसीलदारांना न्यायालयाने पाठवलेली नोटीस

या प्रकरणी सदर दोघा भावांच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनी वरिष्ठ न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि दारव्हा सत्र न्यायालयाने त्या दोघा भावांना जामिन मंजूर करित 'अभ्यासू' तहसीलदार महोदयांना न्यायालयाने दि.२ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर होऊन जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान तहसीलदार यांनी स्वतःचा एक वकील ला घेऊन न्यायालयात हजर राहावे अन्यथा अर्जदाराचे म्हणणे ऐकुण घेऊन योग्य तो आदेश पारित करण्यात येईल असे त्या नोटीस मध्ये नमूद केले आहेत.परंतू तहसीलदार साहेबांकडून ही चुक झालीय का? साहेब तर असे नाही,मग झाल कसं याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad