महाराष्ट्र24 । मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका होत आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेत संजय राठोड ह्यांना पुन्हा मंत्री करण्याबाबत जोरदार हलचाली सुरू झाली आहे.
विदर्भात शिवसेनेकडे आमदार संजय राठोड सारखा दुसरा 'मास' लिडर नाहीत. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत शिवसेनेला फटका बसू नाही. त्याअनुषंगाने आमदार संजय राठोड ह्यांना पुन्हा मंत्री करण्यासंदर्भात मातोश्री मध्ये जोरदार हलचाली सुरू आहे.
आमदार संजय राठोड यांनी निपक्ष चौकशी व्हावी यासाठी पुढे होऊन राजीनामा दिला. विशेष म्हणजे संजय राठोड यांच्या विरोधात कुठेही गुन्हे दाखल नाहीत, चौकाशीत देखील दोषी आढळून आलेले नाही, त्यामुळे शिवसेनेवर बंजारा समाजाची नाराजी दिवसं दिवस वाढत चालली आहे. समाजाचा फटका पक्षाला बसू नये त्यासाठी आमदार संजय राठोड ह्यांना मंत्री करण्यासंदर्भात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची माहिती आहे.
काही महिण्यात नगर परिषद त्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका राज्यात होणार आहे. विदर्भात आमदार संजय राठोड एवजी दुसरा चेहरा शिवसेनेकडे नाही, हे खुद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. आमदार संजय राठोड हे बंजारा,बौद्ध,मराठा आणि मुस्लिम सह इतरही समाजाला घेऊन चालणारा 'मास लिडर' म्हणुन त्यांची ओळख आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागण्याआधी आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्री मंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिण्या किंवा त्या आधी राठोड मंत्री झाल्यास नवल वाटू नये.
दमदार आमदार श्री.संजयभाऊ राठोड यांना मंत्रिपद दिल्यास पक्षाला बळ मिळेल
उत्तर द्याहटवाHe is great leader
उत्तर द्याहटवाखरच संजय भाऊ राठोड यांना लवकरात लवकर मंत्री पद दिलं पाहिजे
उत्तर द्याहटवा