Breaking

Post Top Ad

गुरुवार, १० जून, २०२१

IBPS Vacancies | सरकारी बँकांमध्ये हजारो पदांची महाभरती

IBPS Recruitment 2021


राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. देशभरात लाखो विद्यार्थी यासाठी तयारी करत असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. 

 

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS तर्फे विविध पदांसाठी तब्बल 10,466 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.


ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज), असिस्टंट मॅनेजर, कृषी अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर, ट्रेझरी मॅनेजर, जनरल बँकिंग ऑफिसर, सिनियर मॅनेजर यासह विविध पदांसाठी हि भरती होणार आहे.


कोणत्याही शाखेतील पदवीधरांसह, कृषी व तत्सम अभ्यासक्रमातील पदवीधर, एमबीए, सीए, आयटी पदवी प्राप्त असलेल्या उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी आहे. सामान्य व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 850 रु परीक्षा शुल्क असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व माजी सैनिकांसाठी 175 रु परीक्षा शुल्क आहे.


या महाभरती ची सविस्तर माहिती तसेच राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स लि., महावितरण, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., दक्षिण रेल्वे, भारतीय हवाई दल या इतर भरती प्रक्रियेच्या माहितीसाठी नोकरी मार्गदर्शन www.naukrimargadarshan.com संकेतस्थळाला भेट द्या. 

तसेच नियमित माहितीसाठी Naukri Margadarshan Telegram Channel जॉईन करा.
                                                                     Click Below

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad