Breaking

Post Top Ad

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

"मी जिल्हाधिकारी असलो तरी कोणाचा मुलगा-भाऊ आहेच ना"

"तुम्ही घरातील सदस्यांची काळजी घ्या,मी तुमची घेतोय"; जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहान
कोरोना नावाचा जागतिक संकट सर्वांच्या छाताड्यावर सध्या नाचत आहे. दररोज शंभर पेक्षा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. अशा गंभीर प्रस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास येत्या काही दिवसात जिल्हा कोरोना पासून मुक्त होईल अशा विश्वास जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी महाराष्ट्र 24 सोबत बोलतांना व्यक्त केला.
सध्या जिल्हात दि.११ ऑगस्ट पर्यंत १ हजार ८८६ लोकांना कोरोना झाला. त्या पैकी १ हजार २५० जण उपचारा दरम्यान बरे झाले. मात्र यात सर्वांत जास्त वयोवृद्ध रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण ५० कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा मृत्यू झाला. 

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासना कडून पुर्ण प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रशासनाने दिलेल्या सुचना आणि नियमांचे पालन नागरिकांनी काटेकोरपणे केल्यास हमखास जिल्हा कोरोना मुक्त झाल्या शिवाय राहणार नाही. प्रशासन हा कोणत्याही रूग्णां सोबत दुजाभाव करित नाही, अलीकडे एका रूगाणांने कोविड सेंटर मधून व्हिडिओ व्हायरल केला. मात्र ज्या पध्दतीने संबधित बरा झालेला रूग्णांने वैद्यकीय सेवा देणारे डाॅक्टर, कर्मचारी आणि प्रशासनावर आरोप केले ते चुकीचे आहेत. आरोग्य विभाग आणि प्रशासनाने कोरोना रूग्णांची काळजी घेतली नसती तर 'तो' रूग्ण "पाॅझिटिव्ह चा निगेटीव्ह" झाला असता का अशा सवाल यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी उपस्थित केला.

चार ते पाच दिवसात दोनवेळा जिल्हाधिकारी सिंह यांनी कोविड सेंटर मधील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भेट घेवून त्यांची विचारपूस केली.परिवारातील एकाद्या व्यक्तीला कोरोना झाल्या नंतर रक्तांचे नाते विसरून आपण संबधित रूग्णां पासून दोन हात लांब राहतो. मात्र जिल्हाधिकारी सिंह स्वतः दोन वेळा कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भेट घेवून त्यांची विचारपूस करणारे अधिकारी हे राज्यातील पहिलेच जिल्हाधिकारी असतील.
प्रश्न- कोविड सेंटर मध्ये कोरोना रूग्णांची भेट घेताना तुम्हाला भीती वाटत नाही का?
उत्तर- मी, अतिशय सामान्य कुटूंबात पुढे आलोय त्यामुळे जिल्हातील नागरिकांची काळजी घेणे हा माझा कर्तव्य आहेत. त्या अनुषंगाने कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना सोई सुविधा बरोबर दिल्या जाते की नाही,हे पाहण्यासाठी मी रूग्णांची भेट घेतली. मी, जिल्हाधिकारी असलो तरी कोणाचा तरी भाऊ,मुलगा आहेच ना! 
प्रश्ननागरिकांकडून अपेक्षा काय?
उत्तर- नागरिकांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन सक्षम आहेत. मात्र प्रशासनाने दिलेल्या सुचना आणि नियमांचे पालन नागरिकांनी करावे एवढीच अपेक्षा त्यांच्या कडून आहेत. सुचना आणि नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य केल्यास येणारे दिवस जिल्हासाठी व नागरिकांसाठी आनंदाचे असेल.
प्रश्नसण, उत्सव संदर्भात काय आवाहन कराल
उत्तर - कोरोना सारख्या महामारी चा आजार टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गर्दी मध्ये जातांनी तोंडाला मास्क, हाॅन्ड वास चा वापर करावा. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून राब-राबणाऱ्या बैलांचा सण म्हणजे पोळा काही दिवसा वर आला आहे. पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.मात्र यावेळी शेतकरी,शेतमजुर आणि नागरिकांनी गर्दी न करता हा सण घरीच साजरा करावा.तसेच सर्व गणेशभक्तांनी यावेळी उत्सव साजरा करताना गर्दी टाळावे.

३ टिप्पण्या:

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad