Breaking

Post Top Ad

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

घाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण

 पैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त
 


घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याला घाटंजी वाहतूक पोलिसाने  मारहाण केली. गाडीतील भाजीपाला देखील सादर वाहतूक पोलिसाने रस्त्यावर ठेवायला सांगितला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तळणी येथील संदीप श्रीराम राठोड या शेतकऱ्याने नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील भाजीपाला घाटंजी येथील भाजी मंडीत विक्रीसाठी आणला. घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या गणेश आगे नामक वाहतूक पोलिसाने शेतकऱ्याची गाडी अडवून पैशाची मागणी केली.

वाहनातील भाजीपाला रस्तावर काढायला सांगितला. सदर पोलिसांचा हा नेहमीच शिरस्ता असल्याने गाडी चालकाने त्याला दोनशे रुपये दिले. शेतकरी संदीप राठोड यांनी सदर पोलिसाला नियमबाह्य कारवाई करू नका, शेतकरी अडचणीत आहेत. आम्ही कोणताही नियम तोडला नाही असे बोलल्यावर वाहतूक पोलीस गणेश आगे शेतकऱ्यावर संतापला. 

 

अश्लील शिवीगाळ करून शेतकऱ्याची कॉलर पकडली. "तू मला नियम शिकवू नकोस" असे म्हणत त्याने शेतकरी संदीप राठोड यांना मारहाण केली. माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही. तू हवी त्यांच्याकडे तक्रार कर असा दम त्याने शेतकऱ्याला भरला.

हा वाहतूक पोलीस अनेक वर्षांपासून घाटंजी येथे कार्यरत आहे. गाड्या अडवून त्यांच्याकडून वसुली करणे व न दिल्यास त्यांना कार्यवाहीची धमकी देऊन शिवीगाळ करण्याबाबत गणेश आगे कुप्रसिद्ध आहे. ऑनड्युटी नसतांना अनेकदा गणवेश न घालता वाहनधारकांची अडवणूक करून पठाणी वसुली करण्यात ते पटाईत आहे अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. मात्र त्यांच्या दादागिरीमुळे कोणी तक्रार द्यायला पुढे येत नाही.

सदर शेतकऱ्याने घडलेला सर्व प्रकार महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांना सांगितल्यावर त्यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ याबाबत कळविले. पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मस्तवाल वाहतूक पोलीस गणेश आगे याची खातेनिहाय चौकशी करून त्याला बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी देवानंद पवार यांनी केली आहे.

 


९ टिप्पण्या:

  1. Ha police shipai sgle bike che documents asun sudha dhamki deun garib jante kdun paise lutato,,,,majhe gadiche sgle documents astana sudha majhya bike chi chabi kadun mla dhamki dila ya police shipaya vr yogye ti karyevahi zali pahij,

    उत्तर द्याहटवा
  2. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सोबत वाद करत असेल आणि त्यातला एक पोलीस असेल तर जरुरी नाही की पोलीस अधिकारी चुकतोच हे ठरलेलं आहेत का? सिच्युवेशन काही वेगळी असेल आणि होऊ शकते एकतर्फी मत मांडण्यात आले असेल राहिली गोष्ट भाजीपाला फेकण्याची तर तो व्यवस्थित रचलेला स्पष्ट दिसत आहे. आणि तो फेकला असता तर नाजूक अशी प्लास्टिक ची पिशवी फाटून गेली असती आणि भाजीपाला रस्त्यावर विखरला असता. जो व्यक्ती सर्वांना अडचणीत मदत करत असताना मीं बघितले त्या पोलीस अधिकाऱ्यावर आज आरोप लावल्या जात आहे खरंच दुःख वाटते. परिस्थिती अशी असेल की मोठयाने बोलणे भाग पडले असेल. आणि साधारण गोष्ट आहे मित्रांनो टाळी तर एक हातानी नाही वाजत ना. खोट्या अफवेला बढावा न देता पोलीस प्रशासन यांचे काय मत आहे हे जाणून घेतल्या विना कोणतेही ठाम मत मांडू नये ही आपणास विनंती ��

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ज्या प्रमाणे हाताचे पाचही बोटसारखी नसतात त्याप्रमाणे सगळेच पोलीस कर्मचारी भ्रष्ट असतात असे नाही काही पोलीस कर्मचारी चांगलेही असतात. पण या ठिकाणी एक शेतकरी आपला शेतीचा माल विकायला चालला होता.तो काही चोरीचा माळ,चोरीची रेती किंवा दारू विकायला चालला नव्हता,पोलीस गिरी दाखवायची आहे तर रात्री चालणारे ाावेध धंद्या वर दाखवा शेतकरी आधीच नापिकी, कर्जापाई आत्महत्या करतोय त्यात हे अशे हप्त्ये वसुली काय धंदा लावलाय. निषेध निषेध..

      हटवा
  3. अस काही नसत तोडगा निघु शकतो फक्त कारवाई करणे हाच उपाय नाही lockdown च टेंशन मानसीक त्रास यामुळे सुध्दा काही वेळा बोलण्यात चुक होते शेवटी तोही माणुसच आहे अम्हालाही बरेचदा बरेच लोक काही बोलतात मग आम्हीपण असच करायच का माझ्या मते ज्या शेतकरी मित्राला त्रास झाला असेल मी त्याची माफी मागतो त्या पोलीसातर्फे पण जीवन असच आहे थोडे समजुन घ्या शेतकरी मंजे मोठ्या दिलाचा राजा आहे तुम्ही काम केल नसत तर आज lockdown मधे आम्हाला भाजीपाला कोणी दिला असता ....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. शेतकरी वेगवेगळ्या बाजारपेठेत शेतीचे माल विकायला नेत असतो. तेव्हा अश्या प्रकारच्या त्यांच्याकडून वसुलीचे प्रकार होत असतात. शेतकरी बिचारा फालतू कोणत्याही प्रकरणात अडकण्यापेक्षा ट्राफिक पोलिसांना जे काही दयाचे आहे ते देऊन मोकळे होतात. जे नाही देत त्याच्या सोबत अश्या घटना घडतात. अश्या घटनांना आला बसण्यासाठी अश्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. पुन्हा कोणत्याही शेतकऱ्यावर अशी वेळ येऊ नये.... अश्या घटनांचा जाहीर निषेध

      हटवा
    2. केतन भाऊ तुम्ही या माणसाचं समर्थन करताय? रोज रात्री गाड्या अडवून वसूल्या करतात हे साहेब. आता हे तुम्हाला सांगावं लागेल का? टेंशन व मानसिक त्रास आहे म्हणून काय हे लोकांना शिविगाळ करून मारणार का? ही त्याची पहिली वेळ नाही. युनिफॉर्म न घालता ड्युटीवर नसतांना तो अशा वसूल्या करतो आणि तुम्ही त्याचे समर्थन करता हे आश्चर्यकारक आहे.

      हटवा
    3. तोडगा नाही कारवाई हवी भ्रष्ट लोकांवर

      हटवा
  4. माजलाय हा..याला घरीच बसवा..जो पर्यंत पोलिस प्रशासनात असले लाचखोर असतील..तो पर्यंत जनतेच्या अडचणी दूर होणार नाहीत...आणु यावर काही तोडगा काढायची गरज नाही..आणी केतन साहेब तुम्ही ज्याचे समर्थन करू पाहता आहात.स्वतःला त्या शेतकऱ्यांच्या जागेवर ठेवून पाहा म्हणजे कळणार तुम्हाला पण

    उत्तर द्याहटवा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad