Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'?

'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'?
यवतमाळ: माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.तद्नंतर राठोड यांनी चौकाशी निष्पक्ष व्हावी यासाठी आपण राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे सुपूर्द केल्याचे जाहीर केले.त्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजीनामा मंजूर करा अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली.

'राठोड मंत्री का होऊ शकते'

विदर्भात शिवसेनेचा संजय राठोड एवढा मोठा नेता नाही,त्यामुळे विदर्भात शिवसेनेला जिंवत ठेवण्यासाठी संजय राठोड यांना मंत्री पद देणे आवश्यक आहे.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर गंभीर आरोप झाले मात्र राष्ट्रवादीने एकाही मंत्रीचा राजीनामा घेतला नाही.विशेष म्हणजे मुंडे आणि देशमुख सारखी तक्रार संजय राठोड वर झाली नव्हती तरी देखील राठोड यांनी राजीनामा दिला.राजीनामा दिल्या नंतर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांच्या बदल सकारात्मक असल्याची माहिती असून लवकरच त्यांना मंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे.


विरोधीपक्षांच्या नेत्यांनी अधिवेशन आणि संजय राठोड यांच्या विषयी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "राजीनामा खिश्यात ठेवण्यासाठी घेतला नाही",अशा खोचक टोला भाजपला लगावला होता.त्याच दिवशी अर्थात दि.२८ फेब्रुवारी ला मृतक पुजा चव्हाण चे आई-वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आमच्या मुलीचा जीव गेला.मात्र निव्वल आरोप झाले म्हणुन आणि संशयावरून संजय राठोड यांचा राजकीय बळी जाऊ नये अशी कळकळीची विनंती करणारा लेखी पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले.

'संजय राठोड यांची जमेची बाजु'

दिग्रस-दारव्हा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर संजय राठोड तब्बल वीस वर्षा पासून निवडून येत आहे.राठोड मुळे अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना घरी बसावे लागले.आमदार संजय राठोड यांच्या मतदार संघात मोठी पकड असून विकास कामे मार्गी लावण्यात ते नेहमी अग्रेसर असतात.विशेष म्हणजे रूग्ण सेवा सर्वांसाठी चोवीस तास सेवेत असते.त्यामुळे संजय राठोड दर वर्षी लाखो मताने निवडून येतात.


विदर्भातील मोठे नेते म्हणुन संजय राठोड यांची शिवसेनेत ओळख आहे.राठोड यांनी गेल्या ३० वर्षा पासून सतत शिवसेने सोबत जळून आहे.वनमंत्री असताना संजय राठोड यांच्या ऑडीओ क्लिप च्या जोरावर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्या वर आरोप करण्यात आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.परंतू अद्यापही संजय राठोड यांच्या जागी वनमंत्री म्हणुन कोणाचीही वर्णी लावण्यात आलेली नाही.त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.३ टिप्पण्या:

 1. बरोबर दुसरा पर्याय शिवसेनेकडे नाही संजयभाऊ ला मंञी पद मिळालाच पाहिजे
  संजयभाऊ मतदार संघ दारव्हा दिग्रस नेर

  उत्तर द्याहटवा
 2. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यायला च पाहिजे नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये धनंजय मुंडे अन अनिल देशमुख यांच्या वर गंबीर आरोप झाले गुन्हे दाखल झाले तेव्हा शरद पवार एक शब्द बोलले नाही लगेंच प्रकरण दाबून टाकलं अन संजय राठोड प्रकरणी लगेंच नाराज आहे असे सांगितले वास्तविक हे शिवसेना या पक्षाचा विषय होता पण जाणीव पूर्वक बळी घेतला.स्वतः लहू चव्हाण मा मुख्यमंत्री साहेबाना भेटून याबद्दल सगळं लेखी दिलेलं असूनही राजीनामा घेतला पूर्ण बंजारा समाज हे सगळं समजून आहे

  उत्तर द्याहटवा
 3. लवकरात लवकर शपथ विधी ची तयारी कर

  उत्तर द्याहटवा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad