काही दिवसा आधी राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण प्रकरण पुन्हा गाजणार असून या प्रकरणात जखमी झालेला 'वाघ' बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात येत्या मंगळवारी म्हणजे दि.६ एप्रिल ला धमाका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील पुजा चव्हाण नामक युवतीने पुण्यात आत्महत्या केली.तद्नंतर राजकीय शिमगा सुरू झाला.पूजाच्या आत्महत्याशी थेट तात्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या सोबत नाव जोडून आत्महत्याला कारणीभूत 'राठोड'च असल्याचा आरोप भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष 'चित्रा वाघ' यांनी केला. चित्रा वाघ कडून संजय राठोड यांना सार्वजनिक व राजकीय जिवनातून संपविण्याच्या दृष्टीने नको ते आरोप करणे सुरू केले.दुसऱ्या बाजुला मृतकचे आई-वडिलांनी "आमच्या मुलीला पोल्ट्री व्यवसायात ५० लाख रुपयांचे कर्ज झाल्यामुळे तणावाखाली पुजाने आत्महत्या केली" असे स्पष्ट केले.या प्रकरणात मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार देखील दिली नाही तरीही आमदार संजय राठोड यांच्या वर खालच्या पातळीवर जावून आरोप करण्यात आले.
तात्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना राजकीय जिवनातून संपविण्यासाठी रचलेल्या 'डावा'वर शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने बंदी टाकली.राठोड यांना थेट खुनी,हत्यारा आणि शेण खाणारा असे वारंवार उल्लेख करणाऱ्या भाजप व चित्रा वाघ यांना शेवटी न्यायालयाने फटकारले हे राज्यातील नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहीले.
'तेव्हा शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली'
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मृतक पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राठोड बदल नाराजी व्यक्त करून राजकारणात खळबळ उडवून दिल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना आयता मसाला मिळाला.दुसरी कडे त्यांच्याच पक्षाच्या दोन दिग्गज मंत्र्यांवर गंभीर प्रकारचे आरोप झाले.एवढेच काय गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रकरण सातासमुद्रापार गेला मात्र शरद पवार यांनी देशमुख यांना क्लिनचिट दिली.त्यामुळे बंजारा समाजात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुप्पटी भूमिके संदर्भात नाराजी उमटत असून भविष्यात राष्ट्रवादीला बंजारा समाजाच्या मतदानाचा फटका बसण्याची चर्चा समाजात सुरू आहे.
आपल्या देशात कोणावरही आरोप करण्यासाठी पैसे लागत नाही,आरोप फुकटात करता येते हे पुजा चव्हाण प्रकरणात दिसून आले. शिवसेनेचे संजय राठोड हे शून्यातून पुढे आलेले नेते आहे. ते जेवढे शांत आहेत,तेवढेच ते आक्रमक देखील आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शब्दा पलिकडे संजय राठोड जात नाही,त्यामुळे त्यांनी आरोप झाल्या नंतर मुख्यमंत्री ठाकरेंकडे राजीनामा दिला.काही दिवसा नंतर मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा मंजूर ही केला.मात्र आता हिशोब चुकता करण्याची वेळ आल्याने माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड हे बदला घेण्यासाठी तयारीला लागल्याची माहिती पुढे आली आहे.
'न्यूज चॅलनला ही नोटीस'
मृतक पुजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या संदर्भात मराठी न्यूज चॅनल वरून गेली अनेक दिवस ऑडीओ क्लिप प्रसारीत केल्याने पोलीसांनी सर्व न्यूज चॅनल च्या संपादकांना तुम्हाला सदर ऑडीओ क्लिप कोणी दिली अशी नोटीस बजावली आहे.त्यामुळे ऑडीओ क्लिप व्हायरल करणारा आणि ऑडीओ क्लिप बनवणार चेहरा समोर येणार आहे.
भारतीय राज्यघटनेत एखाद्या ऑडीओ क्लिपमधील आवाजाची शहानिशा करणारी 'स्पेक्टोग्राफी टेस्ट' अद्यापही विकसित झालेली नाही,भाजप नेत्यांकडे ऑडीओ क्लिप ऐवजी दुसरा कोणताही पुरावा नसतांना चित्रा वाघ यांनी आरोपीच्या कटघऱ्यात आमदार संजय राठोड यांना उभे करून त्यांची बदनामी केल्याने राठोड यांना पद सोडावे लागले. त्यामुळे चित्रा वाघ यांनी आरोप करताना त्यांच्या कडे कुठलेली ठोस पुरावे नाहीत.त्याअनुशंगाने आपली,आपल्या पक्षाची आणि समाजाच्या मुलीची बदनामी करून मानसिक त्रास दिल्या प्रकरणी दि.६ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रूपयांचा मानहानी चा दावा संजय राठोड दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.