Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ११ जून, २०२१

'संजय राठोड समर्थक ३० जुनला करणार धूम'

'संजय राठोड समर्थक ३० जुनला करणार धूम'

महाराष्ट्र24यवतमाळ: राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे हजारो समर्थक येत्या ३० जूनला धूम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्या पासून बंजारा समाजासह 'राठोड' समर्थकांमध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यातच कोरोनामुळे या महामारी संकटापुढे सर्वांचे हात टेकल्याने समाज अथवा राठोड समर्थक बऱ्याच महिण्यापासून एकत्र आले नाही.



चार-पाच महिण्यापासून शांत बसलेले आमदार संजय राठोड समर्थक मात्र येत्या ३० जुनला हजारोंच्या संख्येने एकत्र येणार आहे. त्यामागेच कारण म्हणजे आमदार संजय राठोड यांचा वाढदिवस त्या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो समर्थक यवतमाळ शहरात गर्दी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.



आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त एकप्रकारे समर्थक शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे समजते. यवतमाळ शहरात हजारोंच्या संख्येत ३० जूनला एकत्र येण्याबाबत सध्या सोशल मिडीया वर माहिती फिरत आहे. दि. ३० जूनला आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसा निमित्त किती हजार समर्थक एकत्र येणार हे त्याच दिवशी स्पष्ट होईल.

1 टिप्पणी:

  1. Hello,
    I would like to thank you for sharing this interesting information, the tips provided for flashing the ROM will be useful for a lot of people. I was actually looking for a reflection of my life essay, nevertheless, I like it a lot.

    उत्तर द्याहटवा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad