Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ११ जून, २०२१

'यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात काॅग्रेसने फेकला कचरा'

'यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात काॅग्रेसने फेकला कचरा'
महाराष्ट्र24 यवतमाळ:  एकेकाळी यवतमाळ चे नाव सुंदर शहर म्हणून असले तरी आज मात्र कचऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

'यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात काॅग्रेसने फेकला कचरा'

शहरातील वास्तव्य करणार्‍या नागरिकांना नगर प्रशासनाचा पूर्णता विश्वास आहे की नाही याबाबत शंका निर्माण झाली असून कुठल्याही प्रकारची निविदा प्रकाशित न केल्याने वारंवार यवतमाळ शहराच्या मध्यभागी असणाऱ्या लोकांचे वास्तव्य व्यापारी संकुलाच्या समोर कचऱ्यांचे ढीग साचले असून त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

'यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात काॅग्रेसने फेकला कचरा'

एकीकडे कोरोनाचा हाहाकार माजला असताना दुसरीकडे कचऱ्याचे ढीग साचले असल्यामुळे यवतमाळ शहरवासीयांच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. नगर प्रशासनाने वारंवार कचऱ्याच्या संदर्भामध्ये निर्माण केलेली दिरंगाई आता हळूहळू दूर होईल का याबाबतचे निवेदन नगरसेविका यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिले असता जिल्हाधिकाऱ्यांनी काल प्रशासनाच्या वतीने परिपत्रक जाहीर करून तातडीने कचऱ्याचे निवारण करा अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. 

'यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात काॅग्रेसने फेकला कचरा'

मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश नुसतं कागदावर च राहील्याने शुक्रवारी दुपारी दरम्यान काॅग्रेस नगरसेवकांनी चक्क कचऱ्याने भरलेला टॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.फेब्रुवारी महिण्यात मान्सूनपुर्व कामांचा ठरावा घेऊन त्याकरिता २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पावसाळा सुरू झाला. दरम्यान प्रत्येक घरी,प्रतिष्ठाने व जागोजागी जाऊन कचरा संकलित करावा. शहरात कुठे ही कचऱ्याचे ढीग दिसता कामानये असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना बजावले होते.

काँग्रेसचे नगरसेवक हे  जिल्हाधिकारी यांच्या दालनांमध्ये येण्यासाठी निघाले असता पोलिस प्रशासनाने ट्रॅक्टर गेटवर आढवला  व त्याठिकाणी नगरसेविकांनी घोषणा देऊन कचरा तातडीने उचला या बाबतचे निर्देश शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे. या शिष्टमंडळात नगरसेवक चंदू चौधरी, पल्लवी रामटेके इतर सर्व काँग्रेसचे नगरसेवक सहभागी होते येणाऱ्या काळात जर समजा कचऱ्याचे निवेदन किंवा विल्हेवाट न लागल्यास येत्या काळामध्ये आणि आक्रमक आंदोलन इशारा प्रशासनाला  देण्यात आला.


काॅग्रेसचे नगरसेवक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील कचरा आणुन टाकल्याने जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांवर वचक नाही, हे काॅग्रेसने केलेल्या आंदोलनातून स्पष्ट झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. डम्पिंग ची समस्या निर्माण झाली असून कुठल्याही प्रकारची जेसीपी कुठल्याच नगरात गेली नाही, त्यामुळे नगरपालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहराच्या रस्ते भागावर असलेल्या कचरा आता लोकांच्या हळूहळू आरोग्यावर परिणाम करायला लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसामध्ये अनेक प्रकारचे साथीचे रोग निर्माण होणार असून कचऱ्याच्या संदर्भामध्ये नगरपालिका काय नियोजन करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad