Breaking

Post Top Ad

शनिवार, १२ जून, २०२१

'जिल्हाधिकारी सिंह सारखी एण्ट्री करणार का?

'जिल्हाधिकारी सिंह सारखी एण्ट्री करणार का?
महाराष्ट्र24यवतमाळ: जिल्हाधिकारी कार्यालयात काॅग्रेसने कचरा टाकुन जिल्हाधिकाऱ्यांचे वाहण रोखून धरले. त्याच वेळी पोलीसांनी हस्तक्षेप करून जिल्हाधिकारी येडगे यांना वाट मोकळी करून दिली.


यवतमाळ शहरात कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा टाकुन जिल्हाधिकाऱ्यांचे वाहण अडवले. तद्नंतर पोलीसांनी संतप्त नगरसेवकांना ताब्यात ही घेतले.


जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक वर्षा पासून खुर्चीला फेविकॉल लावून बसलेला तो 'आगलाव्या' अधिकारी हा कामचुकार अधिकाऱ्यांना वेळोवेळी सहकार्य करतोय हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. 




त्याचाच भाग म्हणुन यवतमाळ शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही. पडद्या मागुन तो आगलाव्या अधिकारी वेळ प्रसंगी आपल्या वरिष्ठांच्या विरोधात एका झटक्यात कामात हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना उतरवून आंदोलन करण्यास भाग पाडतो.


ज्या मतदारांनी लोकप्रतिनिधींना समस्या सोडविण्यासाठी निवडून दिले आणि प्रभाग मधील समस्या सोडवण्यात प्रशासन हयगय करित असेल तर प्रशासनाचे वरिष्ठ या नात्याने नगरसेवकांनी जिल्हा कचेरी वर शहरातील कचरा टाकत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यात नगरसेवकांचे  चुकले कुठे?


तो आगलाव्या अधिकारी सरकारच्या विरोधात?

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक वर्षा पासून 'वराड' टाकुन बसलेला आगलाव्या  अधिकारी सरकारच्या विरोधात कायम राहत असल्याची चर्चा आहे. तात्कालीन जिल्हाधिकारी विरोधात जेव्हा त्याने आग लावण्याची रणनिती आखली तेव्हा त्याने दारव्हा रोड वरील हाॅटेल मधून पडद्यामागुन भूमिका पार पाडल्याची चर्चा आहे. आरएसएस संघटनेच्या विचार सरणीचा असल्याने शिवसेनेला विरोध करीत असल्याची चर्चा राजकीयवर्तुळात सुरु आहे. 


यवतमाळ जिल्हाचा राजकारण हा कायम चर्चेचा विषय राहीला आहे. जिल्ह्यात कोरोनाची लाट थयथय नाचत असताना तात्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व आरोग्य, महसुल अधिकाऱ्यांमध्ये लावा लावी करून सिंह यांच्या विरोधात आंदोलन उभा करण्यात त्या आगलाव्या अधिकाऱ्यांचा मोठा हात होता. 


आगलाव्या अधिकाऱ्यांला राजकीय नेते दुरूनच सॅल्युट करतात. विशेष म्हणजे गोडबोल्या अधिकाऱ्यांने कोरोना संकटात कधीही रूग्णालयात जावून रूग्णांशी भेट घेतली नाही, किंवा जिल्ह्यात दौराकरून आढावा घेतला नाही. एवढेच काय गेल्या तीन चार वर्षा पासून एकाच जागी बसलेल्या त्या अधिकाऱ्यांने लोकहिता बाबत कधी व कोणते प्रश्न सोडविले हे त्यांना तरी आठवतात का अशा प्रश्न एखाद्याने विचारल्यास उत्तर आजिबात मिळणार नाही.


यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची जिल्हाधिकारी म्हणुन पहिलीच पोस्टींग आहेत. त्यामुळे येडगे यांना 'वाघ' जरी होता आले नाही, तरी देखील 'सिंह' होऊन शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा जिल्हातील नागरिकांची आहे. बाजुला असलेल्या त्या आगलाव्या अधिकारी पासून थोडा दोन हात लांबच राहावं अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad