यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सुरू आहे. प्ररशासनाने सुट दिल्या नंतर नागरिक निष्काळजीपणे बिनधास्त फिरत आहे.त्यामुळे कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यात उद्या पासून लाॅकडाऊन करण्या संदर्भात निर्णय घेतल्याचे कळतेय.सध्या जिल्ह्यात कोरोना रूग्ण मोठ्या संख्येत आढळून येत आहेत.त्यातच आजू बाजूच्यांच्या काही जिल्ह्यात लाॅकडाऊन लागु करण्यात आले असताना दि.१९ फेब्रुवारी पासून पुन्हा जिल्ह्यात पुन्हा लाॅकडाऊन करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
