यवतमाळ: गत तीन दिवसा पासून जिल्ह्यात कोरोनाची पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा लाॅकडाऊन करण्याचे संकेत असल्याची माहिती आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह १०९ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील पुरुष तर आर्णी येथील महिलेचा समावेश आहे. तसेच आज वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ७८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
दि.१७ फेब्रुवारी रोजी ७८ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १४३८० आहे. तर जिल्ह्यात एकूण ४४१ मृत्युची नोंद आहे.सुरवातीपासून आतापर्यंत १४९२६० नमुने पाठविले असून यापैकी १४८७८४ प्राप्त तर ४७६ अप्राप्त आहेत. तसेच १३३३२२ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण ६५७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १०९ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ५४८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६४१ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १५४६२ झाली आहे. कोरोना रूग्णांची संख्या अशीच वाढत राहीली तर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना नाईलाजाने जिल्ह्यात पुन्हा लाॅकडाऊन करण्या शिवाई पर्याय नाही,त्यामुळे तमाम नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे कडेकोट पालन करून कोरोना पासून मुक्त होण्याचा संकल्प करण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.