महाराष्ट्र24 टिम | गेल्या आठवड्याभरा पासून राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या केल्या प्रकरणी भाजप कडून आरोप करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने काही कथित न्यूज माध्यमांनी समाजाची आणि संजय राठोड यांची बदनामी सुरू केली आहे.त्यामुळे सध्या राज्यभरातील बंजारा समाजातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
वनमंत्री संजय राठोड समाजाच्या नजरेत निर्दोष
कायदा हा सर्वांना लागु आहे.अशा प्रस्थितीत विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपात काही सत्य असेल तर संजय राठोड यांना जरूर शिक्षा व्हावी यात काही जुमत नाही.मात्र नुसतं आरोप करून समाज आणि नेत्यांची बदनामी करणार असाल तर बंजार समाज शांत बसणार का? संजय राठोड हे जरी तपासत दोषी आढळले तरी देखील समाजाच्या नजरेत ते निर्दोषच असणार आहे.
पोहरादेवी येथे उसळणार प्रचंड गर्दी
बंजारा समाजातील २२ वर्षीय पुजा चव्हाण या मुलीने तिसऱ्या मजल्या वरून उडी घेऊन आत्महत्या केली होती.मात्र त्या मुलीची आत्महत्या नसून तिचा घात केल्याचा आरोप भाजप कडून करण्यात आला.तद्नंतर अनेक ऑडीओ क्लिप समोर देखील आल्या.पुजाचा मृत्यूला वेगळे वळण लागत असल्याने मृतक पुजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमा समोर येऊ पुजा वर लाखो रूपयाचे कर्ज असल्याने तीने आत्महत्या केली.या बाबत आमचा कोणावर ही संशय नाही,किंवा कोणा विरोधात तक्रार सुध्दा नाही असे स्पष्ट केल्या नंतरही रिकाम टेकडी भाजप आणि त्याचे अती उतावीळ नेते मात्र चुप बसत नसल्याने समाजाची नाहक बदनामी होत आहे.
संजय राठोड यांना का केल्या जातेय बदनाम
बंजारा समाजात कै.वसंतराव नाईक,कै.सुधाकराव नाईक या महान नेत्या नंतर सामान्य लोकांच्या मनात जागा निर्णाण करणारा चेहरा म्हणजे संजय राठोड असून राठोड हे राजकारणात अनेकांना भारी पडत आहे.त्यामुळे हिच ती वेळ असे समजून सेनेतील एक गट आणि विरोधी पक्ष यांनी राठोड यांना संपविण्याची जणू काही सुपारीच घेतली असे चित्र या निमित्ताने दिसत आहे.
विशेष म्हणजे एक दिवस आधी संजय राठोड देणार राजीनामा आणि दुसऱ्या दिवासा पासून लगेच संजय राठोड यांनी दिला राजीनामा सूत्रांची माहिती अशा बातम्या प्रसार माध्यामध्ये सुरू असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून आरोप आणि बदनामीला पुर्ण विराम देण्यासाठी आता खुद वनमंत्री संजय दि.१८ फेब्रुवारी रोजी 'संत सेवालाल महाराज' यांच्या समाधी स्थळ असलेल्या पोहरादेवी येथे येणार असल्याची माहिती खुद मंहत यांनी दिल्याने जवळपास पाच लाख नागरिक जमण्याची शक्यता वर्तविली जात आहे.