वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची काळजी मिडीयालाच जास्त:संजय राऊत

वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची काळजी मिडीयालाच जास्त:संजय राऊत
सध्या ज्या पद्धतीने सोयीस्कर वनमंत्री संजय राठोड यांच्या बातम्या दिल्या जात आहे,हे अंत्यतं चुकीचे असून मिडीयाला च का याची जास्त काळजी अशा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.

यवतमाळ मधून बातमी पसरवणारा तो कोण?

सध्या संजय राठोड यांच्या राजीनाम्याची बातमी काही वृत्तवाहिना मध्ये प्रसारित केल्या जात आहे.मात्र या राठोड संदर्भातील बातमी शिवसेनेने फेटाळली असताना यवतमाळ मध्ये बसून राजीनाम्याची बातमी पसरवणारा तो कोण यांची चर्चा सुध्दा मोठी सुरू आहे.


प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की,हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांच मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील.विशेष म्हणजे संजय राठोड हे शिवसेनेचा मोठा चेहरा आहेत.त्या प्रकरणी पोलीसांना तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.


दरम्यान यावेळी संजय राऊत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राठोड यांच्या राजीनामा दिला की नाही असे विचारले असता यावेळी राऊत म्हणाले की,या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही,तुम्हाला याची जास्त माहिती असेल? अशा खोचक सवाल राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी ना केला.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने