महाराष्ट्र24 । यवतमाळ: आर्णी तालुक्यातील आयता या गावात अचानक घराला आग लागल्याची घटना घडली आणि क्षणभरात माय-लेकीचा जीव गेला.दरम्यान घटनेची माहिती परीसरात हव्या सारखी पसरली अन् जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष काही मिनिटांत घटनास्थळी पोहचतात आणि आगीत मृत्यू झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही परवा न करता प्रयत्न सुरू करतात.जयस्वाल कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना परिसरातील नागरिक आणि मुबारक तंवर यांनी माणुसकी दाखवत मदतीचे प्रयत्न सुरू केले.
काही वेळात त्या ठिकाणी पारवा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक चव्हाण सुद्धा दाखल झाले आणि खाकीत ला अधिकारी विसरून सामान्य नागरिकांसारखा हा अधिकारी मदत करित होता.ठाणेदार तेवढ्यावरच न थांबता जयस्वाल कुटूंबियाना जीवनावश्यक वस्तू मदत म्हणुन देण्यासाठी नागरिकांना आवाहन करता आणि बघता-बघता हजारो नागरिक मदतीसाठी पुढे येतात हे सर्व पाहून माणुसकी जिवंत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर हा जमिनीवरचा माणुस, पद कधी त्यांच्या डोक्यात गेलं नाही,त्यामुळे मुबारक तंवर मागे आजही जिवाभाचे हजारो जण उभे राहतात. खर तर मुबारक तंवर हा जातीने मुस्लिम पण तो कधी कोणाला मुस्लिम आहे असा वाटत नाही.मुबारक तंवर हा अभ्यासू तर आहेतच.मात्र जनतेच्या हक्कासाठी समोरच्या अधिकारी वर्गांना कसं धारेवर धरून नागरिकांचे प्रश्न कसे सोडवून घ्यायचं हे चांगल्या प्रकारे त्यांना माहीत आहे.
राजकारणात मुबारक तंवर सारखी माणस मोठी होणे म्हणजे खऱ्या अर्थाने नागरिकांचा विकास होण्या सारखा आहे.मात्र या स्वार्थी दुनियेत निवडणूकीच्या काळात जाती-जातीत विखुरल्या जात असल्याने मुबारक तंवर सारखी व्यक्तीमत्वांना निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेण्याची वेळ येते.सावळी परिसरातील तमाम नागरिकांनी मुबारक तंवर सारखा हिऱ्याला राजकारणात मोठं करणे त्या परिसरातील नागरिकांची जवाबदारी आहे.मुबारक तंवर वर जातीचा लेबल न लावता त्याला सहकार्य केल्यास परिसराचा विकास शंभर टक्के शक्य आहे.सर्वच क्षेत्रात मुबारक तंबर हा परिपक्व आहे.त्यामुळे संधी द्यायला हरकत नाही.