महाराष्ट्र24। मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दि.८ मार्च रोज मंगळवार ला पेन ड्राईव्हचा पुरवा देत घणाघाती आरोप केले."आम्ही नुसतं आरोप करित नाही,तर पुराव्यासहीत आरोप करतो" असे ही ते सांगायला विसरले नाही.विरोधीपक्षाला लोकशाहीत मोठ महत्त्व आहे.त्यामुळे फडणवीस यांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल तर ते लोकशाहीसाठी घातकच आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांना फसवण्याचा कट रचल्या जात असल्याचा फडणवीसांचा आरोप आहे. सभागृहात केलेल्या आरोपांची चौकाशी व्हायला पाहीजे आणि महाविकास आघाडीचे कोणते नेते विरोधकांना फसवण्याचा कट रचत आहे.या संदर्भात चौकाशी होणे गरजेचे आहे. सत्य राज्यातील जनते समोर यायला पाहिजे अशी भावना नागरिकांची आहे.
देवेंद्र फडणवीस हे सभागृहात काय बोलणार आहेत यांची पुर्व माहिती प्रसार माध्यमांना मिळाली कशी? सरकरी वकील यांची व्हिडिओ क्लिप फडणवीसांच्या हाती लागली कशी? म्हणजे ठरवून गेलेला कार्यक्रम तर नाही ना? भाजपाला माहिती आहे की, या जमान्यात सोंन पांघरूण चिंध्या विकता येते,मात्र चिंध्या पांघरूण सोंन विकता येत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की, जमाना मार्केटीग चा आहे.