'या वकिलने केला जोरदार युक्तीवाद'
दारव्हा येथील 'अॅड,अमोल चिरडे' यांनी फुलारे बंधूंना न्याय मिळवून देण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला.त्यानंतर न्यायालयाने दोघांना जामिन देत तहसीलदार भोसले वर कारवाई संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करित न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.
तहसीलदार भोसलेंच्या अडचणी वाढणार?
आर्णी तालुक्यातील बोरगांव येथील दत्ता आणि अनिल फुलारेंवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवल्यानंतर लवकरच तहसीलदार भोसले विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असून बोरगांव येथील काही मंडळी भाजपचे किरीट सोमय्या यांची भेट घेऊन तहसीलदार भोसलेंची ईडी मार्फत चौकाशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती पुढे आली आहेत.असे झाल्यास तहसीलदार भोसलेंच्या अडचणीत वाढ होणार हे स्पष्ट आहेत.
बोरगांव येथील दत्ता फुलारे आणि अनिल फुलारे यांनी नायब तहसीलदार आदमुलवाड यांच्याशी हुज्जतबाजी करित अंगावर टॅक्टर नेल्याचा आरोप करित दोघांविरुद्ध पोलीसात तक्रार देण्यात आली.त्यानंतर दोघांविरुद्ध कलम ३५३,१८६ ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
बर तो अमोल गेल्या अनेक वर्षांपासून कशा?
आर्णी तहसील मध्ये अमोल नामक तलाठी अनेक वर्षांपासून कशा कार्यरत आहेत? असा सवाल उपस्थितीत होत असून तो सर्व वसुल करित असल्याची चर्चा सुरू आहेत.
'आर्णीकर दादागिरी खपवून घेत नाही'
आर्णीच्या इतिहासात आर्णीकर अथवा तालुक्यातील नागरिक कधीच कोणत्या अधिकाऱ्यांची दादागिरी खपवून घेत नसल्याचा इतिहास आहे.चांगली कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण आर्णीकर पाठीशी ठाम उभे राहतात.हे आलीकडे तात्कालीन ठाणेदार पितांबर जाधव यांची अचानक झालेल्या बदली दरम्यान दिसून आले.तात्कालीन ठाणेदार चंदेल आणि खंदाडे यांना आर्णीकर काय चीज आहेत,हे चांगलेच माहिती आहेत.त्यामुळे तहसीलदार भोसले यांनी पदाचा दूरपयोग न करता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करावे अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

