Breaking

Post Top Ad

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर स्वच्छता अभियान;जिल्हाधिकारी सिंह

रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर स्वच्छता अभियान;जिल्हाधिकारी सिंह
 नव्याने रूजू झालेले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात आठवडा भर स्वच्छा मोहीम ला सुरूवात करण्यात आली.जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या मोहीमेला हिरवी झेंडी दाखवली.दरम्यान पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी यांनी हाती घेतलेल्या मोहिमेचे कौतुक केले.

रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर स्वच्छता अभियान;जिल्हाधिकारी सिंह
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर स्वच्छता अभियान नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी ही मोहीम हाती घेतली. दरम्यान या मोहिमेचे शुभारंभ पालकमंत्री सामंत यांनी केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कार्तिक पुजारी,जिल्हा पोलीस अधीक्षक मोहीत गर्ग सह आदी जण उपस्थित होते.


रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर स्वच्छता अभियान;जिल्हाधिकारी सिंह
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून या मोहिमेला पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला सुरूवात केली.जिल्हाधिकारी सिंह हे आगळावेगळा उपक्रम राबविण्यात कायम राज्यात ते पुढे राहिले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता मोहिम राबवून जिल्हा स्वच्छतेच्या बाबती पुढे नेण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.दरम्यान जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकारी सह कर्मचारी हे देखील ह्या मोहिमेत सहभागी होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी देखील स्वच्छता मोहिमेत हातभार लावावा जेणे करून हि स्वच्छता अभियान लोक चळवळ बनेल असे आवाहन जिल्हाधिकरी सिंह यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad