महाराष्ट्र24 । मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मानसन्मान राखत गेली ५६ वर्ष एक पक्ष, एक नेता, आणि एक मैदान असा आब राखणारा शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडतोय.दुसरी कडे शिवसेनेतून कोलांडी घेत भाजपच्या लफड्यात अडकलेले शिवसनेचे बंडखोर आमदार, खासदारांनी कोट्यावधी रूपये खर्च करून माणसं मेळाव्यासाठी नेल्याची मोठी चर्चा सुरू आहेत.
शिंदे गटातील मंत्र्यांनी तीन कोटी रूपये खर्च करून आपआपल्या जिल्ह्यातून भाड्याने माणसं मुंबई येथील बिकेसी मैदानावर पार पडणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी नेल्याची जोरदार चर्चा रंगत आहेत. शिवसेनेचे एक निष्ठ असलेले शिवसैनिक चटणी भाकर बांधून शिवाजी पार्क येथील मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. रेल्वेच्या डब्यात बसून घरून चटणी,भाकर खात असतानाचा निष्ठावंत शिवसैनिकांचा फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहेत.
पहिल्यांदाच मुंबईत दसरा निमित्य दोन मेळावे होत आहेत.त्या अनुषंगाने पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहेत.शिंदे गटाने कॅश दहा कोटी रूपये देऊन एसटी बस बुक केल्याची माहिती पुढे आल्यानंतर अनेकांना धक्का बसला.नेमका हा पैसा आणला कुठून? अशी चर्चा होत आहेत.शिवाय अनेक मंत्र्यांना तीन कोटी रूपये खर्च करण्याचा टार्गेट देण्यात आल्याची चर्चा आहेत.कोणी पाचशे गाड्या बुक केल्या तर कोणी तीनशे ट्रॅव्हल्स मधून लोकांना मेळाव्यासाठी मुंबई घेऊन गेलेत. प्रश्न असा उपस्थित होतोय की शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचे मंत्री कोट्यावधी रुपये खर्च करतात नक्की हा पैसा त्यांनी शेतात काम करून जमा केले होते की अन्य मार्गाने हा पैसा जमावला याची सखोल चौकाशी होणे गरजेचे आहेत.
