अतिवृष्टी, पूरबाधितांच्या मदतीसाठी जिल्ह्याला 204 कोटींचा निधी
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे दोन हेक्टरपर्यंत बाधित क्षेत्र 2 लाख 17 हजार 241.57 हेक्टर एवढे आहे. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 2 लाख 63 हजार 609 आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 185 कोटी 10 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. शेतजमिनीच्या नुकसानग्रस्त 10,757.73 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 19 कोटी 76 लाख 63 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.राज्यात नैसर्गिक आपत्तीबाधितांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 1 हजार 71 कोटी 77 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
याबाबतचा जीआर महसूल व वन विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आला.नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response