Breaking

Post Top Ad

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात

यवतमाळ-वाशिम लोकसभा  मतदारसंघात मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात
यवतमाळ-वाशिम लोकसभा मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात आली असून आता उमेदवारीसाठीची लढाई प्रमुख पक्षात सुरू झाली आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील कोणता पक्ष लढणार याबाबत उत्सुकता असतानाच या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघात १९९९ पासून शिवसेना तब्बल पाच निवडणुकात विजयी झालेली आहे. शिवसेनेची टक्कर काँग्रेस उमेदवारासोबत होत राहिली. दरम्यान, मध्यंतरी राजकीय उलथापालथीत विद्यमान खासदार भावना गवळी शिंदे गट सेनेत गेल्याने आता या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट कोणाला मैदानात उतरविणार याबाबतची उत्सुकता असतानाच काँग्रेसने लोकसभेसाठी मतदारसंघावर दावा ठोकला आहे. 


काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठीचा मुद्दा प्रसंगी दिल्लीपर्यंत रेटला जाईल,असे सांगितल्या जात आहे.तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ हक्काचा असल्याचा दावा केला आहेत.महाविकास आघाडीला लोकसभेची जागा राखण्यासाठी आघाडीतील सर्व पक्षांची एकजूट ठेवावी लागणार आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीपुढे तेच आव्हान असेल.


लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार?

ठाकरे गट - सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर राठोड, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज,माजीमंत्री संजय देशमुख,वैशाली देशमुख,माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार आणि वाशिम मधून कॅप्टन सुर्वे हे असू शकते. 
काँग्रेस- माजी मंत्री शिवाजीराव मोघे,मानिकराव ठाकरे
शिंदे गट - खासदार भावना गवळी अजून दुसरा चेहरा चर्चेत नाही
भाजप - आमदार नाईक,आमदार मदन येरावार


शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर भाजप यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे ठेवण्याची तयारी दिसते.खासदार भावना गवळींबाबत मतदारांमध्ये नाराजी असल्याने हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी मतदारसंघात भाजपने संपर्क वाढविला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दर महिन्यात एक दोन वेळा दौरे करित आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी देखील यवतमाळ वाशिम मतदार संघात जनसंपर्क वाढविल्याने त्यांची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad