यवतमाळ जिल्ह्याला मोठा राजकीय वारसा लाभला असतांना यवतमाळकरांनी बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना का निवडून द्याचा असा सवाल यानिमित्ताने उपस्थितीत केल्या जात आहेत.त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील आणि आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार माजी मंत्री संजय देशमुख यांनाच आम्ही निवडून आणणार असा विश्वास सध्या यवतमाळ कर व्यक्त करतांना दिसत आहेत.
खासदार हेमंत पाटील यांच्य पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील ह्या नांदेड येथील आहेत.महायुतीने विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करून राजश्री पाटील याना निवडणूकीच्या रिंगणात उतरविल्याने गवळी समर्थकात नाराजी आहेत.त्यामुळे ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना मोठा फायदा होणार हे जवळपास निश्चित आहेत.
दुसरीकडे बघितले तर शिवसेनेत फुट पडल्यापासून उद्धव ठाकरे मागे प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झाली असून आम्ही यंदाच्या निवडणुकीत आम्ही यवतमाळ चा उमेदवार निवडून देऊ अशी प्रतिक्रिय उमटताना दिसत आहेत.त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख निवडून येतील असे वातावरण निर्माण झाले आहेत.
