बंजारा समाज बांधवाचा भाजप नेत्यांना इशारा

बंजारा समाज बांधवाचा भाजप नेत्यांना इशारा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात बंजारा समाजातील पुजा नामक युवतीने आत्महत्या केल्या वरून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या वर वाटेल त्या पद्धतीने भाजप नेते आरोप करित आहे.त्यामुळे बंजारा समाजात भाजप नेत्यांबदल तीव्र नाराजी उमटत असताना संत सेवालाल महाराज जयंती दिनी बंजारा समाजाचे नेत्यांची बदनामी सहन केल्या जाणार नसल्याचा इशारा देत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.


परळी तालुक्यातील पुजा चव्हाण या तरूणीने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा खुलासा मृतकचे वडील लहू चव्हाण यांनी केला असून आम्ही कोणा वरही संशय नसल्याचे जाहीर केल्या नंतर ही काही भाजप नेत्यांनी बंजारा समाजातील नेत्याची बदनामी सुरू ठेवली आहे.त्या अनुषंगाने भाजप कडून होणारी बदनामी त्वरीत थांबवण्या बाबत बंजारा समाजाच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.


दरम्यान दिलेल्या निवेदनातून भाजप ला इशारा देण्यात आला असून भाजप ने समाजाची आणि नेत्यांची बदनामी सुरूच ठेवल्यास त्यांचा परिनाम भाजप नेत्यांना भोगावा लागेल अशा इशारा देण्यात आला आहे.स्व.पुजा चव्हाण यांच्या कुटूंबीयांनी कोणा विरोधात आमची तक्रार नसून गेल्या काही दिवसा पासून फोल्ट्री फाॅमचा व्यवसाय मध्ये प्रचंड नुकसान झाल्याने लाखो रूपयाचा कर्ज  मृतक पुजा हिच्या होते.त्यातूनच पुजाने आत्महत्या केल्याचा खुलासा वडील लहू चव्हाण यांनी केला आहे.त्यामुळे मृतक मुलीची आणि समाजाची बदनामी करण्याचा षडयंत्र भाजप च्या नेत्यांनी रचला आहे.परंतू आमच्या सहनशीलतेची वाट न पाहता होणारी बदनामी तात्काळ थांबा असे आवाहान दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. संत सेवालला महाराज यांच्या जयंती निमित्त बंजारा समाजातील हजारो मंडळी संत सेवालला महाराज यांच्या मंदिरावरून तहसील कार्यालयात जावून निवेदन दिले.यावेळी आर्णीचे प्रथम नगराध्यक्ष अनिल आडे,शिक्षक नेते राजुदास जाधव,उपसभापती रवी राठोड,रमेश चव्हाण,प्रकाश जाधव,प्रेमकिशन राठोड,विलास चव्हाण,विनोद चव्हाण,गणेश राठोड सह दोनशे लोकांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले.

2 टिप्पण्या

Thanks For Your Valuable Response

  1. भाजप चे समाजातील दलालांना गावतच फिरु देऊ नका नमक हरामी ऐक शब्द सुदा सहानभुती न दाकवता टाळु खायचे काम करताय नालायक लोक

    उत्तर द्याहटवा
  2. भाजप चे समाजातील दलालांना गावतच फिरु देऊ नका नमक हरामी ऐक शब्द सुदा सहानभुती न दाकवता टाळु खायचे काम करताय नालायक लोक

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने