आर्णी(यवतमाळ) राष्ट्रवादी चे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्याने पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सुरू उमटत असताना दि.१० फेब्रुवारी रोजी या संदर्भात आर्णी येथील विश्रामगृहात अधिकृत पत्रकार परिषद घेऊन त्यात अनेक राष्ट्रवादी काॅग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत असल्याची माहिती दिली.
२२ पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
माजी आमदार ख्वाजा बेग यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्या नंतर आर्णी तालुक्यातील तब्बल २२ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदा चा राजीनामा दिला आहे.
आर्णी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषद मध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.त्या दरम्यान पत्रकार परिषदेत अंबर बोलताना म्हणाले की,ख्वाजा बेग पक्षासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करित असल्याने ते अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काॅग्रेस च्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे आम्ही देखील सर्व पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांना दिली.तसेच 'आम्ही' पदाचा राजीनामा दिला आहे,पक्षाचा नाही असे देखील सांगायला ते विसरले नाही.