महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आल्यानंतर सर्व सामान्य माणसाला उराशी धरणारा प्रशासकीय अधिकारी म्हणुन यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह यांचा आवर्जुन उल्लेख होतो.दि.९ फेब्रुवारी ला जिल्हाधिकारी सिंह यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस सर्व सामान्य नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करताय हि बाब सनदी अधिकाऱ्यांसाठी खुप मोठी आहे.
यवतमाळ जिल्हाचे जिल्हाधिकारी म्हणुन एम.देवेंदर.सिंह यांनी दि.१५ फेब्रुवारी २०२० रोजी पदभार स्वीकारल्या नंतर सर्व प्रथम जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसून काढण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांनी 'मिशन उभारी' हि संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.हि बाब जिल्ह्यातील शेतकरी बांधवानासाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल.कारण आता पर्यंत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी अशा उपक्रम एकाही अधिकाऱ्यांनी राबविला नाही.
जग,देश आणि राज्य जागतिक संकट कोरोना मुळे होरपळत असतांना जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना करून 'कोरोना' संकट स्थिर ठेवला.जिल्ह्यातील लहान-सहान बाबींबर बारीक लक्ष ठेवून प्रशासनाची धूरा खांद्यावर घेत "मी आपल्यातलाच आहो" ही ओळख सामान्य माणसांना पटवून दिली.कोरोना संकटात जिल्हा स्थिर ठेवण्यात जिल्हाधिकारी सिंह यांचा सिंहाचा 'वाटा' राहीला. जिल्ह्यातील समस्याग्रस्त,गरजू,गरिब,होतकरू,महिला,युवा तसेच इतर महत्वपूर्ण समस्यांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना आफूलकीने जवळ बोलावून समजून घेण्याचं धाडस जिल्हाधिकाऱ्यांनी केली,त्यामुळे जिल्हावाशीयांसाठी आनंदपर्वणीच आहे.आजही महाराष्ट्राच्या वैभवपूर्ण इतिहासात यवतमाळच्या मातीची ताकद राहावी यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्याला सलामच.
कोरोनाच्या काळात स्वतः रूग्णांची संवाद साधत तेथील व्यवस्थेबाबत प्रशासकीय सूचना देण्याचं महत्वपूर्ण कार्य यवतमाळ च्या इतिहासात सुवर्ण अक्षरांत लिहिल्या जाईल.माणसे मोठे होण्यासाठी मनाची विशालता महत्वाची असते.शिस्त,संयम आणि समस्यांचे चिंतन करण्याचं धाडस करित अनेक समस्यांवर फुंकर घालण्याचं कार्य हे गौरवणीय आहे.याचीच परिणीती म्हणुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बोलावून शाबासकी ची थाप जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या पाठीवर दिली.तर मिशन उभारीचा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यात सुरू केल्या बरोबरच महाराष्ट्राच्या 'मुख्यमंत्र्यांनी' जिल्हाधिकारी यांचा कौतूकाचा वर्षाव केला.
"माणूस द्या मज माणूस द्या" या राष्ट्र संताच्या उक्ती प्रमाणे माणसांशी जुळणाऱ्या व्यक्ती महत्वाचा अर्थात जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह यांचा वाढदिवस.! भारतीय संस्कृती ही 'तमसो मा ज्योती र्गमय' या पायावर उभी असतांना सम्यक विचारांचा वारसा चालविणारी आहे.तथागताच्या सम्यकवादी देशात आपणास मानवतेचं ध्यान,सामान्याचं ज्ञान,वैश्विक विज्ञान,ज्ञानेश्वरीचं पसायदान,माणसाचा सन्मान सतत मिळत राहो हीच मनोकामना करित शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता,पुरंदरची दिव्यता,सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हिच शिवचरणी प्रार्थना करतो..!