यवतमाळ : रविवारी दि.६ सप्टेंबर रोजी दिवसभरात तासात जिल्ह्यात नव्याने १९० पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून तीन कोरानाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले १८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
यवतमाळ: जिल्हात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पासून कोरोना विषाणू संसर्गाचा ब्लास्ट झपाट्याने वाढत आहे. सुरू महिण्यात पहिल्याच दिवसा पासून कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या दुप्पटीने वाढली असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाचा फैलावही पुढे वाढू नये त्या अनुषंगाने नागरिकांनी सावध राहून काम करण्याची गरज आहे.
मृत झालेल्या तीन जणांमध्ये यवतमाळ शहरातील ६३ वर्षीय पुरुष आणि ५६ वर्षीय महिला तर पांढरकवडा शहरातील ६२ वर्षीय पुरुष आहे. तसेच गत रविवारी दिवसभरात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १९० जणांमध्ये पुरुष १०३ आणि महिला ८७ आहेत. यात यवतमाळ शहरातील पुरुष ३० व महिला २३ तसेच तालुक्यातील एक पुरुष, कळंब शहरातील आठ पुरुष व सात महिला तसेच तालुक्यातील चार पुरुष व नऊ महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष व तालुक्यातील एक महिला, दिग्रस शहरातील सहा पुरुष व नऊ महिला व तालुक्यातील दोन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील १० पुरुष व १० महिला व तालक्यातील सहा पुरुष व तीन महिला, झरी जामणी शहरातील सहा पुरुष व सहा महिला, दारव्हा तालुक्यातील तीन पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील एक महिला व तालुक्यातील दोन पुरुष, घाटंजी शहरातील पाच पुरुष व तालुक्यातील चार पुरुष व पाच महिला, उमरखेड तालुक्यातील एक पुरुष व तीन महिला, महागाव शहरातील ११ पुरुष व पाच महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील एक पुरुष आणि बाभुळगाव शहरातील एक महिला पॉझेटिव्ह आले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात १८४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४२५३ झाली आहे. यापैकी २९५९ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ११८ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २३० जण भरती आहे.
