Breaking

Post Top Ad

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

१३९ जण पाॅझिटिव्ह तर १८१ जणांना सुट्टी

१३९ जण पाॅझिटिव्ह तर १८१ जणांना सुट्टी

यवतमाळ : सध्या कोरोना संसर्गाची पातळी जिल्ह्यात धोकादायक स्थितीत कडे जात आहे. आज सोमवार ला येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले १८१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत दिवसभरात  नव्याने १३९ जण पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.


मृत झालेला व्यक्ती हा पुसद शहरातील ४२ वर्षीय पुरुष आहे. तर नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १३९ जणांमध्ये पुरुष ८३ आणि महिला ५६ आहेत. यात यवतमाळ शहरातील १५ पुरुष व १३ महिला, यवतमाळ तालुक्यातील चार पुरुष, नेर शहरातील एक पुरुष, वणी शहरातील १८ पुरूष व १३ महिला, पुसद शहरातील १५ पुरूष व १६ महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरूष व दोन महिला, महागाव शहरातील दोन पुरूष, महागाव तालुक्यातील एक पुरूष, पांढरकवडा शहरातील सात पुरूष व दोन महिला, घाटंजी शहरातील पाच पुरूष व तीन महिला, दिग्रस शहरातील सात पुरूष व दोन महिला, दारव्हा शहरातील एक महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरूष व एक महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील चार पुरूष व चार महिलांचा समावेश आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ७६६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ३०६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४३९२ झाली आहे. यापैकी ३१४० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ११९ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २०६ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad