भारतीय
सैनिकांसोबत चीनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात झटापटी केल्याने त्यात देशाचे
जवान शहीद झाले. चीनचे सुध्दा सैनिकांना भारतीय जवानांनी जबरदस्त धडा
शिकवला. त्या अनुषंगाने देशभरातून चीन विरोधात एकप्रकारे संतापाची लाट तयार
झाली. परिणामी केंद्र सरकारने टिकटॉक, पबजी, युसी ब्राऊजर या आघाडीच्या
अँप्सह शेकडो एप्सवर बंदी घातली.
भारतीय सैनिकांना सलामी देत चीन
ला टक्कर देण्याच्या दृष्टीने मध्य प्रदेश या राज्यातील उजैन शहरात दोन
विद्यार्थ्यांनी 'वंदे भारत' स्वदेशी ब्राऊजरची निर्मिती केली आहे.. हा
अॅप आता यूसी ब्राऊजर ला उत्तम पर्याय म्हणून वापरता येईल. यामध्ये
कोणत्याही वापरकर्त्याचा डेटा सेव्ह होणार नाही, तसेच अॅपद्वारे फेक
बातम्या मिळणार नाहीत, फक्त चांगल्या बातम्या युजर्सपर्यंत पोहोचतील.
दि.१५-१६
जुन रोजी गलवान खोऱ्यात चीन सैनिकांना अचानक भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला
होता.त्यामुळे चीन विरोधात सर्वच क्षेत्रातून जबरदस्त विरोध करण्यात आला.
चीन
विरोधात नागरिकांचा संतापाची लाट पाहून केंद्र सरकारला चीनच्या अनेक
मोबाईल अॅप वर बंदी घातली. चीन मोबाईल अॅपला पर्याय देण्यासाठी उजैन
येथील दोन विद्यार्थ्यांनी 'वंदे भारत' नावाचा स्वदेशी मोबाईल ब्राऊजर
अॅप' तयार केल्याने त्याचे कौतुक होत आहे. राहुल बारोड व श्वेता परमार या
विद्यार्थ्यांनी वंदे भारत अॅप तयार केले आहे. मोजक्या दिवसात या अॅपचा
वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. विशेष म्हणजे वंदे भारत
या मोबाईल अॅपमध्ये कोणत्या यजूरचा डाटा सेव्ह होत नाही. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानातून प्रेरणा घेऊन या अॅपची
निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले.
या अॅपचा इंटरफेस अतिशय
आकर्षक असून आवश्यक त्या वेबसाईट्सचे शॉर्टकट्स दिलेले आहेत. समस्त
भारतीयांनी या अॅपचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
वापरकर्त्यांच्या गरजा सूचनांनुसार वेळोवेळी यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात
येतील अशी माहिती त्यांनी दिली.

