Breaking

Post Top Ad

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

जितेंद्र मोघेंच्या प्रचारार्थ अनिल आडे मैदानात

जितेंद्र मोघेंच्या प्रचारार्थ अनिल आडे मैदानात


महाराष्ट्र24यवतमाळ : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू झालीय. अशात आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता असतानाच काँग्रेसचे युवा नेते अनिल आडे हे मैदानात उतरले असून घरोघरी जाऊन ते काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघे यांचा प्रचार करताहेत. अनिल आडेंना मानणारा वर्ग तालुक्यात मोठा आहेत.त्यामुळे जितेंद्र मोंघेना यांचा प्रचंड फायदा होणार आहेत.


आर्णी काॅग्रेस मध्ये उभी फुट पडली.यात साजिद बेग,अहमद तंवर,अनंता पाटील आदी नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.मात्र सगळ्यांची उणीव भरून काढण्याची ताकत एकट्या अनिल आडे यांच्यात आहेत.त्यामुळे आर्णी तालुक्यातून काॅग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघेंना मोठ्या प्रमाणात मतदान होणार असल्याची चर्चा आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad