Post Top Ad
गुरुवार, १८ मार्च, २०२१
अफरातफर केल्या प्रकरणी चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
यवतमाळ-आर्णी येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅकेत तब्बल २९ लाख २७ हजार ५०१ रुपयांचा अफरातफर केल्या प्रकरणी शाखा व्यवस्थापक योगीता सुनिल पुसनाके,माजी शाखा व्यवस्थापक अमोल पांडुरंग मुजमुले,माजी लेखापाल विजय खुशालराव गवई आणि माजी रोखपाल अंकीत दिपक मिरासे यांच्या वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेची फिर्याद उपसरव्यवस्थापक रणजित मधुकर गीरी यांनी दि.१७ मार्च ला रात्री उशीरा आर्णी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दिली त्यावरून चौघाविरोधात अफरातफर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा आर्णी येथे उपसरव्यवस्थापक रणजित गीरी यांनी दि.२३ फेब्रुवारी रोजी तपासणी केली होती.तद्नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२४ फेब्रुवारीला शाखेला भेट देऊन शाखेतील रोख रक्कम २७ हजार ९९० रूपये कमी आढळून आली.तसेच तपासणी कालावधीत वेळेवर ३० लाख रूपये बाहेरून पोत्यात आणतांना निदर्शनास आले.त्यामुळे शाखेमध्ये तपासणी करण्याकरिता चार्टंड अकाउंटंट यांची नेमणूक करून दि.१६ फेब्रुवारी पासून बॅंकेच्या ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी केली असता त्यात २५ ग्राहकांच्या खात्यामध्ये ८९२७५०१ रूपयांची अफरातफर झाल्याचे चौकाशीत निष्पन्न झाले आहे.
शाखेतील संबधित आरोपींनी ग्राहकांच्या खात्यातून डुप्लीकेट सहीद्वारे,विड्राॅलवर खोडतोड करून अफरातफर केली.विशेष म्हणजे अफरातफर करण्याचे काम सन जानेवारी २०१८ पासून ते १२ मार्च २०२१ पर्यंत सुरू असल्याचे आढळून आहे.त्यामुळे सदर घटनेची तक्रार उपसरव्यवस्थापक रणजित गीरी यांनी गुरूवारी रात्री उशीरा आर्णी पोलिसात दिल्या नंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Tags
महाराष्ट्र#
यवतमाळ#
Share This
About TeamM24
यवतमाळ
लेबल:
महाराष्ट्र,
यवतमाळ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response