Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

४० पाॅझिटिव्ह रूग्णांची भर;६६ जणांना सुट्टी

४० पाॅझिटिव्ह रूग्णांची भर;६६ जणांना सुट्टी
यवतमाळ, दि. २१ ऑगस्ट  वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ६६ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून ४० पॉझिटीव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

सध्या जिल्हात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा वाढता प्रादुभाव लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून सुरक्षित राहण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी स्वतःची व घरातील सदस्यांची काळजी घेण्याचा आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

मृत झालेला व्यक्ती हा पुसद येथील आंबेडकर वॉर्डातील रहिवासी ६० वर्षीय पुरुष आहे. आज शुक्रवारी नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ४० जणांमध्ये २४ पुरुष आणि १६ महिला आहेत. यवतमाळ शहरातील श्रीकृष्ण सोसायटी येथील तीन महिला, सेजल सोसायटी अंबिका नगर येथील तीन पुरुष व तीन महिला, आदर्श नगर येथील एक पुरुष व एक महिला आणि यवतमाळ शहरातील एक पुरुष, महागाव शहरातील एक पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, बाभुळगाव शहरातील दोन पुरुष, आर्णि शहरातील पोलिस स्टेशन जवळील एक पुरुष, आंबेडकर चौकातील तीन पुरुष, झरी शहरातील दोन पुरुष, वणी शहरातील वामन घाट येथील एक पुरुष, वणी शहरातील एक पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा शहरातील चार पुरुष व तीन महिला आणि नेर तालुक्यातील मालखेड येथील एक महिला पॉझेटिव्ह आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी १६८ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ३९९०८ नमुने पाठविले असून यापैकी  ३९१६१ प्राप्त तर ७४७ अप्राप्त आहेत. तसेच ३६६३९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ६२० ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर १७५ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २५२२ झाली आहे. यापैकी १६६४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६३ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १५२ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad