Breaking

Post Top Ad

बुधवार, १७ मार्च, २०२१

'जिल्ह्यात एकाच दिवशी निघाले एवढे रूग्ण'

'जिल्ह्यात एकाच निघाले एवढे रूग्ण'
यवतमाळ: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणसुध्दा वाढले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी तब्बल १००७ जण कोरोनामुक्त झाले. तर जिल्ह्यात बुधवारी गेल्या चोवीस तासात चार जणांचा मृत्यु झाला असून ४३५ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. 


बुधवारी पॉझिटीव्ह आलेल्या ४३५ जणांमध्ये पुरुष ३२६ आणि महिला १०९ आहेत. यात यवतमाळ १५९, पुसद ८७, दिग्रस ५९, दारव्हा ४९, पांढरकवडा १९, बाभुळगाव १५, उमरखेड १४, महागाव १३, नेर ५, वणी ४, आर्णी ३, झरीजामणी २, घाटंजी १, मारेगाव १ आणि इतर ठिकाणचे ४ रुग्ण आहे.


आस्थापना व दुकानांच्या वेळेत बदल 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना सोमवार ते रविवार या सातही दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरु राहतील. दुध विक्रेते / डेअरी यांची दुकाने सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांची दवाखाने त्यांच्या औषधी दुकानांसह), पेट्रोल पंप व गॅस वितरण कोणत्याही निर्बंधाशिवाय नियमित वेळेनुसार सुरू राहतील, असे जिल्हा प्रशासनाच्या आदेशात नमुद आहे.


वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या १००७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ७८ वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील ८० वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील ६९ वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुष आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad