Breaking

Post Top Ad

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

'काॅग्रेसच्या जितेंद्र मोघेंना मतदारांचा वाढता प्रतिसाद'

'काॅग्रेसच्या जितेंद्र मोघेंना मतदारांचा वाढता प्रतिसाद'
महाराष्ट्र24:यवतमाळ, सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहेत.एकमेकांवर चिखलफेक केल्या जातेय.मात्र भलत्याच कारणाने सर्वाधिक चर्चेत आलाय तो म्हणजे आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघ.काॅग्रेस कडून जितेंद्र मोघे तर भाजप कडून राजू तोडसाम निवडणूकीच्या रिंगणात आहेत.


काॅग्रेसचे जितेंद्र मोघे पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून जनसामान्यातून मोघेंना प्रचंड प्रतिसाद मिळकतांना दिसत आहेत.विशेष म्हणजे सर्वात तरुण चेहरा म्हणुन जितेंद्र मोघे कडे बघितल्या जाताहेत.उच्चशिक्षित उमेदवार काॅग्रेसने मोघेंच्या रूपाने दिलाय.भाजपाचा एक मोठा गट जितेंद्र मोघेंना उघड पाठींबा देणार असून हा कार्यक्रम लवकर एका मोठ्या हाॅटेल मध्ये पार पडणार आहेत.

माजी मंत्री शिवाजीराव मोघेंनी अनेकांना राजकारणात वाढवलं मात्र ते उपकार सर्व विसरून अनेकांनी भाजपच्या तंबूत जाणं पसंद केलं.तरही मोघेंना वाढता पाठींबा आणि मतदारांतून मिळणारा प्रतिसाद हे अनेकांसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहेत.एकीकडे जितेंद्र मोघे तर दुसरीकडे माजीमंत्री शिवाजीराव मोघे मतदारांची भेटी घेतांना दिसताय.त्यामुळे हि,निवडणूक मोघेंसाठी जड जाणार नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगताय.सुरूवातीला असं चित्र रंगविल्या गेलं की,लढत रंगतदार होईल मात्र भाजप मधूनच माजी आमदार राजू तोडसाम यांना विरोध होत असल्याने काॅग्रेस उमेदवाराला उघड पाठींबा मिळत आहेत.

'अॅड शिवाजीराव मोघे प्रचारात सक्रिय'

'काॅग्रेसच्या जितेंद्र मोघेंना मतदारांचा वाढता प्रतिसाद'


अंशी ओलांडलेल्या माजी मंत्री आणि आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष 'शिवाजीराव मोघे' या वयात मुलगा आणि काॅग्रेसचे उमेदवार जितेंद्र मोघेंचा प्रचारासाठी गावात गावात जाऊन मतदारांची भेटीगाठी घेताहेत.मोघे जमीनीवर चा लोकनेता असून त्यांना अधिक अधिक लोकांची भेट घ्यायला आधीपासून आवडतात.जितेंद्र मोघेंना माजी मंत्री मोघे प्रचार करत असल्याने मोठा फायदा होणार हे देखील तेवढच खरय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad