सध्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली.इच्छुक उमेदवार भेटीगाठी देण्यावर भर देताहेत.गेल्या काही दिवसाआधीच राज्याचे माजीमंत्री आणि काॅग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहिर केले.तद्नंतर त्याचे चिरंजीव जितेंद्र मोघे हे मतदारसंघातील मतदारांची भेटीगाठी घेताहेत.त्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय.
दोन पंचवार्षिक पासून आर्णी-केळापूर मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून येताहेत.माजी आमदार राजू तोडसाम नंतर डाॅ.संदीप धुर्वेंना उमेदवारी भाजपने दिली आणि ते काटावर निवडून आले.गेल्या पाच वर्षापासून ते कोणाचाही संपर्कात नाही.त्यामुळे आर्णी-केळापुर मतदारसंघाला आमदार आहेत की,नाही असे चित्र आहेत.आमदार धुर्वेंवर खुद्द भाजपाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते नाराज आहेत.मात्र मतदार देखील नाराज असल्याची उघड चर्चा आहेत.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा बोलबला असणार यात अजिबात शंका नाही.त्यातच 'जितेंद्र मोघे' हे उच्चशिक्षित आणि तरूण आहेत.त्यातच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सोबत असल्याने आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसचे जितेंद्र मोघे निवडून येणार हे काळ्यादगड्यावरची रेष आहेत.होतकरू आणि तरूण चेहरा म्हणुन जितेंद्र मोघे कडे बघितल्या जातेय.त्यामुळे तरुणांमधून जितेंद्र मोघेंना अधिक पसंती मिळतेय तर दुसर्या बाजुला शिवाजीराव मोघे देखील मैदानात उतरले आहेत.जितेंद्र मोघे हे शिवाजीराव मोघे साहेबांचा मुलगा आहे.त्यामुळे साहजिकच मतदारांचा कल जितेंद्र मोघेंच्या बाजुने असणार हे देखील तेवढचं सत्य असून मतदारसंघात जितेंद्र मोघेंचा आतापासूनच आवाज घुमताना दिसतोय.
