Breaking

Post Top Ad

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

जनसेवेची ध्येयसिद्धी जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह

जनसेवेची ध्येयसिद्धी जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह
महाराष्ट्र24 टिम : प्रशासकीय सेवेत भरती होऊन जनतेची सेवा करण्याचे स्वप्न तारुण्यात उभारणीच्या काळात अनेक जण पाहतात.त्यासाठी मोठी मेहनतही घेतात. पण ध्येयाने पछाडलेल्या फार थोड्यांना यात यश मिळते.

जनसेवेची ध्येयसिद्धी जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह
यशस्वी झालेल्या मधील अनेक जण व्यवस्थेच्या चक्रात अडकून आपले मूळ स्वप्न विसरतात, यातील फार थोडे जण मात्र पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे खऱ्या अर्थाने जनसेवेचे व्रत जोपासण्यात यशस्वी होतात.

जनसेवेची ध्येयसिद्धी जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह
यवतमाळ जिल्हाचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह अशा फार थोड्या लोकांमधील एक आहेत, हे त्यांनी आजवर केलेल्या कामातून दाखवून दिले आहे. 

जनसेवेची ध्येयसिद्धी जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह
शेतकरी आत्महत्येचा कलंक लागलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कामाचा वेगळा ठसा उमटवणारे धारिष्ठ फार कमी लोक दाखवतात, पण जिल्हाधिकारी सिंह यांनी या समस्येकडे जनसेवेची संधी म्हणून पाहिले हे त्यांच्या कामावरून दिसते. भेटायला आलेला प्रत्येक शेतकरी असो किंवा त्यांचे शिष्टमंडळ त्यांच्याशी ते आपुलकीने वागतात, त्यांचा संपूर्ण मान ठेवतात, त्यांचे काम कसे होईल यासाठी पुढाकार घेतात. 

जनसेवेची ध्येयसिद्धी जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह
जगाचा पोशिंदा अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही जोखडात अडकून मरणाला जवळ करतोय, त्यांना दिलासा देऊन पुन्हा उभा करण्यासाठी जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांसाठी 'मिशन उभारी' या उपक्रमातून अनेक योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचतील यासाठी ते कायम आग्रही असतात. त्याचे सकारात्मक परिणाम या भागात दूरगामी ठरणार आहेत.

जनसेवेची ध्येयसिद्धी जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह
तेलंगणातील निजामाबाद येथील मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या एम. देवेंदर सिंह यांचे शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षण सरकारी शाळेत झाले आहे. त्यामुळे ते कार्यरत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद,नगरपालिकांच्या शाळातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी त्यांनी योजना आखल्या आहे.जनसेवेच्या व्रताचे स्वप्न पहात यांनी प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. ते पूर्ण करण्यासाठी मोठी मेहनत घेतली.

जनसेवेची ध्येयसिद्धी जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह
आय आयटी झाल्यावर बँकेत दिल्ली, मुंबई, पुणे आणि भारताबाहेरही नोकरी केली, आणि अखेर २०११ मध्ये यूपीएससी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. सांगली जिल्ह्यातील 'जत' येथे उपजिल्हाधिकारी गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी तसेच अकोला चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर काम करतानाही आपला वेगळा ठसा उमटवला. 

जनसेवेची ध्येयसिद्धी जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह

उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार देतांना पंतप्रधान मोदी

बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना डाटाबेस अपलोड करण्यात तसेच पंतप्रधान पिक विमा योजनेत शेतकऱ्यांचा मोठा सहभाग करून घेण्यातही त्यांनी अव्वल स्थानावर पोहोचवले होते.त्यामुळे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार देतांना पंतप्रधान मोदी
कोरोनाच्या संकटात सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवून जिल्हाधिकारी सिंहा सारखा शहरात एकटा फेरफटका मारतांना

कोरोनाच्या संकटात सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवून जिल्हाधिकारी सिंहा सारखा शहरात एकटा फेरफटका मारतांना
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील  शेतकऱ्यांसाठी "मिशन उभारी" मधून दिलासा देण्याचे काम सध्या जिल्हाधिकारी सिंह यवतमाळ जिल्ह्यात करताय.जनसेवेचे स्वप्न पाहणारा माणूस अशा एखाद्या जबाबदार पदावर कार्यरत झाल्यानंतर परंपरागत व्यवस्थेत अडकतो. 

कोरोनाच्या संकटात सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवून जिल्हाधिकारी सिंहा सारखा शहरात एकटा फेरफटका मारतांना

महामारी च्या संकटात जिल्हाधिकारी लोकांमध्ये जावून त्यांना धीर देत होते.

व्यवस्था पण अशा लोकांना स्वीकारत नाही. त्यांच्यातील शिस्तप्रियता अनेकांना खटकते. या व्यवस्थेत फार थोडे लोक अशा लोकांच्या ध्येय प्राप्तीसाठी पुढाकार घेतात हे सातत्याने पाहायला मिळते, पण एम.देवेंदर.सिंह यांनी परंपरागत व्यवस्थेला फाटा देऊन सर्वांच्या सहकार्याने जनसेवेचे व्रत खऱ्या अर्थाने सुरू ठेवले आहे त्यांच्या कार्यास शुभेच्छा..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad