छत्रपती संभाजीनगर : वैशालीताई धोंडे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ एका ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. शिवाच्या वाटचालीत वैशाली ताईंचे योगदान खूप मोठे आहे. शिवा संघटना आणि ओबीसींच्या संघटन कार्यात त्या पडद्यामागे असल्या तरी प्रत्येकाला जोडण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांना मिळावी यासाठी निघत असलेल्या या ग्रंथात प्रत्येक कार्यकर्त्यांने लिहावे असे आवाहन शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष.अभय कल्लावार यांनी केले आहे.
शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या पत्नी वैशालीताई यांचे काही महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी शिवा संघटनेच्या वतीने त्यांच्यावर एक स्मृती ग्रंथ काढण्यात येत आहे. यासंदर्भात अभय कलावर यांनी सांगितले की, कपिलधार येथे आयोजित शिवा संघटनेच्या 30 व्या राज्यव्यापी मेळाव्यात मी स्वतः या स्मृती ग्रंथा संदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे.त्यानुसार आम्ही सर्व कार्यकर्त्यांना लिहिते व्हा असे आवाहन केले आहे त्यासोबत त्यांच्या संदर्भातील छायाचित्रे पण मागवली आहेत.
स्मृती ग्रंथाबाबत त्यांनी सांगितले की, आपण अनेकदा वाचतो, ऐकतो आणि लोकांनाही सांगतो की, प्रत्येक पुरुषाच्या, महापुरुषाच्या मागे एक स्त्री असते. त्या पुरुषाला उभे करताना त्या स्त्रीला काय यातना भोगाव्या लागल्या, कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले हे विसरले जाऊ नये.
वैशालीताई वर असा अन्याय होऊ नये म्हणून आम्ही हा संकल्प केला आणि त्यातून प्रेरित होऊन शिवा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक नांदेडला आयोजित केली. संपादक मंडळ अंकासाठी प्रयत्न करत आहेत. वैशालीताईंचे आप्त स्वकीय आणि कार्यकर्ते त्यांच्या आठवणी या अंकात लिहीत आहेत.
वैशालीताईंचं काम मोठ आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला जोडण्याचं, त्याचं सुखदुःख जाणून त्यांना सांभाळण्याचं, धोंडे सरांनी उभा केलेला संघटनेचा मोठा संसार सांभाळण्याचं काम त्या माऊलीने केलं.
धोंडे सरांना ताकद, ऊर्जा देण्याशिवाय संघटनेच्या प्रत्येक कार्यात त्यांचे चैतन्य ऊर्जा राहिली. बहुजनांची माऊली होऊन त्या जगल्या, त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांना मिळावी यासाठी हा स्मृती ग्रंथ तयार होत आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे .वेळ कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी वैशालीताई संदर्भातील आपले अनुभव ,आठवणी लिहून पाठवाव्या असे आवाहन केले आहे.
_________________
