Breaking

Post Top Ad

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

सेंद्रीय शेतीसाठी समर्पित महिला गौरव:संगीता सव्वालाखे

सेंद्रीय शेतीसाठी समर्पित महिला गौरव:संगीता सव्वालाखे
सेंद्रीय शेतीसाठी स्वत:ला झोकुन देणाऱ्या यवतमाळच्या शास्त्रझ संगीता कहारे सव्वालाखे यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भरारी घेतली आहे.संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्कोकडून तसेच भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे आनॅर  ऑफ एक्सलन्स या सन्मानाबरोरच झी 24 तास कडून त्यांना अटल सन्मान मिळालेला आहे.

किटकशास्त्रात एम.एस्सी.(कृषी) असलेल्या संगीता यांनी मानवाधिकार विषयात पदविका देखील मिळवली आहे.वडिल कीटक शास्त्र विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एन पी कहारे    यांच्याकडून कीटकशास्त्र  विषयाचं बाळकडू आणि प्रोत्साहन मिळाल्यामुळे  महिला ज्या क्षेत्रात पदार्पण करण्याची हिम्मत करणार नाही ते क्षेत्र संगीता ने पादाक्रांत केले आहे. ज्येष्ठ पत्रकार अंकिता पोहरकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत ऑरगॅनिक फार्मिंग म्हणजे नेमकं काय? हे स्पष्ट करताना संगीता म्हणाल्या की, सेंद्रिय शेती ही संकल्पना आता सगळीकडे तुम्हाला शहरी आणि ग्रामीण भागात  ऐकायला मिळते.या शेतीचा मूळ उद्देश बिनविषारी आणि रासायनिक खत कीटकनाशकांचा वापर कमीत कमी किंवा नसावा आणि त्याद्वारे आपण जी शेती करू याच्यामध्ये चांगलेच पोषक असे  उत्पादन घेणे हा आहे.

प्रा.न.मा.जोशी । ८८०५९४८९५१

विदर्भ बायोटेक लॅब अर्थात  व्हिबाएल  च्या संचालिका असलेल्या संगीताच्या ह्या लॅब मध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट बनतात आणि ते शेतीसाठी कसे उपयोगी आहेत या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले कीआमच्या व्हिबाएल मध्ये बायोपेस्टीसाईड ,बायोफर्टीलायझर आणि बायोफंजीसाईड त्याला  जिवाणू म्हणतो त्या मायक्रो ऑर्गनायझरचा उपयोग करून या तिन्ही औषधे बनवल्या जातात याचा उपयोग आपल्याला रासायनिक खताचा पर्याय म्हणून होतो. त्यापासून जैविक किंवा सेंद्रिय खत तयार करता येते.उदाहरणार्थ एरिया व्हर्टिसिलियम हे सगळे किटक मारणाऱ्या औषधी आहेत. मात्र यामध्ये सगळे कीटक मारत नाही ही माझ्या मते खूप चांगली गोष्ट. यामध्ये फक्त पीकांना अपायकारक असलेले कीटक मरतात. आपल्यासाठी फ्रेंड इंसेक्ट म्हणजे मित्र किडेआहे त्यांना कुठलाही अपाय न होता निसर्गचक्राचा जो भाग आहे तो कुठे वेस्ट न होऊ देता पेस्ट कंट्रोल केल्या जातात.डी कंपोस्ट कल्चर म्हणजे काय ? असे विचारले असता त्यांनी फार सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.आपल्याला रस्त्याने जाताना दुतर्फा बर्‍याच गावात तिथे शेणखत पालापाचोळा पिकांचे अवशेष असलेले ढीग लागलेले दिसतात. ते इतक्या मोठ्या प्रमाणात असतात आणि ते वाया जातात.ही नैसर्गिक संपत्ती वाया जाउ द्यायची नाही तर तीला डीकंपोज करून  करून कंपोस्ट खत बनवणे.

आपल्या जमिनी चा कसं या खतामुळे वाढतो. कंपोस्ट करण्यासाठी त्याला खतामधे रूपांतर करण्यासाठी कंपोस्टिंग कल्चर तयार केलेला आहे . उदाहरणार्थ  दिल्ली हरियाणा पंजाब येथे आपल्याला दिसते की रब्बी पिके घेण्यासाठी खरीप पिकांचे कुटार  कचरा (पराली)मोठ्या प्रमाणावर जाळतात.हे बंद करुन तो कुटार कचरा डीकंपोजिंग कल्चर द्वारे  शेतात पसरवणे त्यानंतर डी कंपोस्ट कल्चरचा त्याच्यावर एक फवारणी किंवा पाण्याद्वारे त्याला ट्रीटमेंटट करून खत तयार होते.याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे प्रदुषण कमी होते.दुसरा फायदा हा की जमीन अजून कसदार बनते.खत इतकं सुंदर होतं की लोकांचे पैसेही वाचतात.विदर्भातील शेतकऱ्यांना हे द्यायला आम्ही तयार आहोत. शेतकऱ्यांना चांगलंली सेवा देण्यासाठी आम्ही एनजओ स्थापन केली आहे.    कारण विदर्भ बायटेक लॅबला थोड्या मर्यादा आहेत. आम्ही सगळं करू शकत नाहीत .ते प्रॉडक्शनयुनिट आहे.मी एम एस्सी अग्रिकल्चर कृषी कीटकशास्त्र मध्ये केलं त्या वेळेस ठरवले होत ही माझ्यातर्फे जेवढं काही शेतकऱ्यांसाठी करता येईल ते मी करीन. एनजीओ मार्फत गेल्या पंचवीस वर्षांत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि खुप मोठ्या प्रमाणात शिबिरे घेऊन मोफत कन्सल्टन्सी केल्या जाते.

महाराष्ट्राच्या  शेतकऱ्यांसाठी फ्री कन्सल्टन्सीआहे.फोनवर पण आम्ही मार्गदर्शन करतो.कोठलाही फोन आला तरीही आम्ही त्यांना मार्गदर्शन देतो.शेतकऱ्यांसाठी पण खूप चांगली गोष्ट झालीआ हेकी, एखाद्या व्हाट्सअप वर समस्या पाठवा आम्ही उत्तर देतो.मी ईस्राईलला दोनदा गेली होती.एकदा आयपीएम अर्थात एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी गेले होते.दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सौभाग्यवती कांचनताई गडकरी यांच्यासोबत. त्यावेळी अग्रिकल्चर फेअर चे आयोजन होते त्यात स्वतः नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला होता दोन्ही वेळचा अनुभव कसा आहे.संगीता म्हणाल्या की  आयपीएम मध्ये प्रशिक्षण घेतले.रासायनिक खतांचा वापर करून सेंद्रिय शेती केल्या जाते अतिशय कमी पाणी असलेल्या या प्रदेशात शेतकरी उत्तम शेती करतात.नवनवीन प्रकारची टेक्नॉलॉजी त्यांनी शोधून काढली आहे त्याचा फार उपयोग झाला.तिकडे अगदी शेवटचा ऑप्शन म्हणजे रासायनिक खताचा असतो.

त्यांच्यामध्ये प्रथमता नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने करणे आणि मग जर कुठलं कंट्रोल होत नाही तर शेवट ऑप्शन म्हणजे रासायनिक असतो.कांचन गडकरीं सोबत असल्याने आम्ही सगळीकडे गेलो होतो.तीथे तर नवीन टेक्नॉलॉजी आहे. कमी पाणी असताना ते इतके चांगल्या पद्धतीने शेती कशी करतात तोआम्हाला अनुभव मिळाला .डेअरी फार्मिंग आणि त्यांचे बरेच वेगवेगळ्या ठिकाणी आणि तो अनुभव खूपच चांगला होता . याच एग्रीकल्चर फेअर मधे यवतमाळचे जिल्हाधिकारी,सध्या पुणे येथे जिल्हाधिकारी आहेत, त्या डॉक्टर राजेश देशमुख यांचा परिचय झाला होता.देशमुख हे अतिशय हुशार. मनमिळाऊ स्वभावाचे अधिकारी गृहस्थ आहेत.त्यांच्याशी चांगलीत मैत्री जमली होती. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांना तुम्ही काय संदेश द्याल?  शेतकरी सेंद्रीय शेती कडे वळला आहे पण तो ज्ञमोठ्या प्रमाणात वळणयाची गरज आहे.कारण सध्या सगळीकडे सेंद्रिय शेती मधल्या उत्पादनांची मागणी आहेत . सामान्य नागरिकांना पण एक सांगावसं वाटतं की तुम्ही ऑर्गानिक फर्मिंग सेंद्रिय शेती उत्पादनांची मागणी केली तर आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आणि जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील आणि आपल्याला सकस अन्नधान्य भाजीपाला फळफळावळ मिळतील आणि शेतकरी कल्याण साधता येईल.

लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad