Breaking

Post Top Ad

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

यवतमाळ मध्ये इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू

यवतमाळ मध्ये इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू
यवतमाळ शहरात मुख्य बाजारपेठेतील अवैध बांधकामामुळे ईमरतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून  शहरातील ठिकठिकाणी असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुनिल भानारकर असे मृत युवकाचे नाव आहे.


मृतक सुनिल हा एका व्यापारी व रहिवासी इमारतीत घरगुती काम करीत असताना ईमारतीची कमकुवत गॅलरी कोसळली, या अपघातात सुनिल हा ईमारतीवरून खाली कोसळला व मलब्यात दबून त्याचा दुर्दैवी अंत झाला.


अत्यंत वर्दळीचा हा परिसर असून पहील्या माळ्यावरील गॅलरी कोसळली  मात्र सुदैवाने अन्य जीवितहानी झाली नाही. जुन्या मेन लाईन परिसरात बालाजी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर ही भीषण दुर्घटना घडली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad