शिरपूर वरून महागाव कडे येत असताना आंबोडा येथील ब्रिज वर ऑटो चालकांचे नियंत्रण सुटल्याने ऑटो पलटी झाला. या अपघातात प्रकाश रघु चव्हाण ४५ वर्षीय यांचा मृत्यु झाला. तर जखमींना सवना येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की शिरपूर वरून महागाव कडे येत असलेला ऑटो क्र. एम एच २२ यु ४२५७ प्रवाशी घेऊन येत असतांना अचानक चालकाचे ऑटो वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या झालेल्या अपघातात प्रकाश रघु चव्हाण हे गंभीर रित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ सवना येथील ग्रामीण रूग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली. तर इतर जखमींवर सवना येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.पुढील तपास महागाव पोलीस करीत आहे.