Breaking

Post Top Ad

रविवार, २० डिसेंबर, २०२०

यवतमाळ पोलीसांकडुन ३५ लाखांची दारू जप्त

यवतमाळ पोलीसांकडुन ३५ लाखांची दारू जप्त
यवतमाळ । शहर पोलिसांनी गस्त दरम्यान एका संशयित ट्रक वर कारवाई केली असता या ट्रक मध्ये  ३५ लाख रुपये किंमतीची अवैध देशी, विदेशी दारू चा  साठा आढळून आला.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दारू औरंगाबादच्या रेडीको डिसलेरी कंपणीची आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूच्या साठ्यावर  पोलिसांनी कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

'ह्या लोकांवर झाले गुन्हे दाखल'

यवतमाळ लगत असलेल्या वर्धा आणि चंद्रपुर जिल्ह्यात शासनाने दारूबंदी घोषीत केली आहे.रेडीको एनव्ही डिस्टीलरीज महा.लिमिटेड औरंगाबाद कंपणीचे मालक, एन.सी.सी. ट्रांस लाॅजीस्टीक नाशिकचे मालक अमन चौधरी,गाडी मालक गोकुळ सिताराम वाखुरे रा.औरंगाबाद आणि वाहन चालक योगेश लघाने यांच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रात्रीच्या दरम्यान यवतमाळ शहर पोलीस गस्ती वर असतांना यवतमाळ धामणगाव  बाय पास वर ट्रक क्रमांक एम.एच.२० डी.ई.२०७२ हा संशयास्पद आढळून आला, तेव्हा पोलिसांनी ट्रक ची तपासणी केली असता ट्रक मध्ये दारू आढळून आली.चालकाची  चौकशी करून त्याला दारू बाबतची कागद पत्राची चौकशी केली असता चालक घटना स्थळाहुन पसार झाला. त्या नंतर पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला आणि त्यातील ५०० पेटी विदेशी दारू साठा जप्त केले.

एका भाजप नेत्यांची होतेय चर्चा 

यवतमाळ पोलिसांनी ३५ लाखांची दारू साठा जप्त केल्यामुळे या घटनेशी भाजप च्या एका नेत्यांचा संबंध जोडल्या जात असून यांची मोठी चर्चा होतांना दिसत आहे.

हा दारू साठी औरंगाबाद येथील रेडिको डीसलरी  कंपनी चा असून त्याची किंमत ३५ लाख रुपयांच्या घरात आहे. औरंगाबाद -यवतमाळ मार्ग चंद्रपुर साठी निघालेला ट्रक यवतमाळ मध्ये पकडल्याने तस्करी चे बिंग फुटले. दारू बंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात हा दारू साठा जात असल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.सर्व दारू साठा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी  यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad