अखेर बदलीला स्थगिती:मित्र मंडळ करताय दिवाळी साजरी

अखेर बदलीला स्थगिती:मित्र मंडळ करताय दिवाळी साजरी
राज्य सरकाने संदर्भाधीन आदेशान्वये पाच जिल्ह्यातील कोविड-१९ च्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन २०-२१ या आर्थिक वर्षात उपजिल्हाधिकाऱ्यांची बदलीचे आदेश काढले असताना २४ तासाच्या आत बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी मॅट मध्ये जावून बदलीला स्थगिती मिळवली.


यवतमाळ येथील उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांची देखील बदली झाली होती.या बदलीला काही लोकांनी वेगळा स्वरूप देऊन अधिकाऱ्यांमध्ये भांडण लावण्याच्या हेतूने कारस्थान रचून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालवल्याची चर्चा सुरू आहे. अधिकाऱ्यांना कुठेही काम करावंच लागते.त्यामुळे मॅट मध्ये जावून स्थगिती मिळवणे याचा अर्थ काय अशा सवाल या निमित्ताने उपस्थितीत केल्या जात आहे.


यवतमाळ येथील महसुल प्रशासनातील वादामुळे वऱ्हाडे यांची बदली झाल्याची चर्चा त्यांच्या मित्र मंडळात सुरू असल्याची चर्चा आहे.मात्र एकट्या वऱ्हाडे यांची बदली करण्यात आली नव्हती.असे अनेक वऱ्हाडेंची बदली सरकाराने केली. वर्ष न वर्ष एकाच जागी पाल ठोकून बसणाऱ्या अधिकाऱ्यांना मलीदा खाण्याची सवय लागल्याने शेवटी मॅटचा आधार घेऊन पुन्हा आपल्या जागी आल्याने संबधित मित्र मंडळात सध्या दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने