Breaking

Post Top Ad

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

हॅलो जो बीडेन, हॅलो कमला!

हॅलो जो बीडेन, हॅलो कमला!
साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जिओ बिडेन यांनी बाजी मारत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना चारीमुंड्या चीत केले आहे. डोनाल्ड ट्रम्प च्या विजयाची आशा   करणारे आणि त्यांच्यासाठी थेट अमेरिकेत जाऊन अप्रत्यक्षरीत्या निवडणूक प्रचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बिडेन यांचे अभिनंदन केले आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी मोदी सरकारने रद्द केलेल्या कलम ३७० च्या विरुद्ध मत व्यक्त केले होते.  मोदी यांनी कमलाचेही अभिनंदन केले आहे . आंतरराष्ट्रीय राजकारणात काही औपचारिकता निभवावी लागतात. मोदी यांनी जो बिडेन आणि  कमला यांचे केलेले अभिनंदन हे नक्कीच मनापासून केलेले नाही, ते फक्त ओठातून प्रकट झाले आहे. बिडेन निवडून आले तर अमेरिकेचे भारताशी  संबंध कसे राहतील हाही सध्या चर्चेचा विषय आहे. त्यासंबंधी नंतर लिहिता येईल . या निवडणुकीच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या घटना ंचा उल्लेख येथे करता येईल.

अमेरिकेत कोण राष्ट्राध्यक्ष होणार यापेक्षा रशियातील एका टीव्हीने वेगळ्याच गोष्टीकडे लक्षवेधले आहे. रोसिया २४ या सरकारी वाहिनीने अमेरिकेतील रस्त्यांवर ओरडत फिरणाऱ्या, किंचाळणाऱ्या लोकांचे व्हीडिओ प्रसारित केले. अमेरिकन निवडणुका म्हणजे वेडेपणा आहे असं त्यांनी संबोधलं आहे. अमेरिकेत अराजक माजलं असून त्यांची लोकशाही अपयशी ठरत असल्याचं त्यांनी सांगितले.अखेर तो क्षण आलाय…ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट पहात होतो. हे सर्व ऑलिंम्पिक मॅरेथॉनसारखं वाटतंय..जेव्हा खेळाडू शेवटचे ४०० मीटर धावण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करतात..शरीर खूप थकलेलं असतं..स्नायू दुखत असतात..पण, शेवटचे काही मीटर्स वेगाने धावण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असत.

न.मा. जोशी- ८८०५९४८९५१

मतदार काय म्हणतात?

आमना नावाच्या या मतदारांनी बीबीसी रेडिओ लाइव्ह  ५ शी बोलताना सांगितलं, ट्रंप यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचं म्हटल्यावर त्यांना दुःख झालं.

क्षणचित्रं

अमेरिकाच नाही, अख्खं जग या निकालाकडे डोळे लावून बसलं होतं.अमेरिकेतील प्रसिद्ध वकील बॅरि रिचर्ड्स यांनी यावेळेस कायदेशीर वादात पोस्टल मतं अडकतील अशी शक्यता वर्तवली. ते २००० साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीतील न्यायालयीन वादात बुश यांचे वकील होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने जॉर्ज बुश हे अल गोरे यांच्याविरुद्ध निवडून आले होते. अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदावर निवडून आलेल्या कमला हॅरीस या पहिल्या महिला आहेत. अमेरिकेत अध्यक्षपदाची  निवडणूक झाल्यानंतर चार  वर्ष निवडणूक होत नाही. मृत्यू राजीनामा किंवा महाभियोग खटला इत्यादी कोणत्याही कारणाने अध्यक्षाची पद रिक्त झाल्यास उपाध्यक्ष हा उर्वरित कालावधी साठी अध्यक्ष होतो. पुढच्या खेपेला कमला हॅरीस अध्यक्ष पदाच्या उमेदवार राहतील अशी असल्याची चर्चा आहे. तसेच झाले आणि त्या निवडून आल्या तर अमेरिकेत त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील. आतापर्यंतच्या इतिहासात ही महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नाही . गेल्या खेपेला हिलेरी क्लिंटन उभ्या होत्या पण डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव होता.

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी सीनेट चे सदस्य झाले होते.

२८८ आणि २००८ एक-दोनदा बिडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी प्रयत्न केला होता. दोन दशकांच्या प्रयत्न नंतर बिडेन यांना अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. डिसेंबर महिन्याच्या १४ तारखेला निवडून आलेले अध्यक्षीय मतदार अध्यक्षपदासाठी मतदान करणार आहेत.२३ डिसेंबरला पत्रिका मला पोहोचणार आहेत. तीन जानेवारीला काँग्रेसच्या दोन्ही सभा गृहातील निर्वाचित सभासद सदस्य पदाची शपथ येणार आहेत. सहा जानेवारीला मतमोजणी होईल. आणि निवडून आलेला उमेदवार जो बिडेन २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेऊन व्हाइट हाउस मध्ये प्रवेश करतील.

जिओ बिडेन यांनी अमेरिकन मतदारांना म्हटले आहे की तुम्ही आशा एकात्मता सत्य यांची निवड केली आहे. अमेरिकेला झालेल्या जखमांवर मलम पट्टी करण्याची ही वेळ आहे. ट्रम्प यांना मतदान करणाऱ्या मतदारांची  निराशा झाली असेल असे सांगत बिल्डिंग म्हणाली की मीदेखील दोनदा निराश झालो होतो. चला आता आपण एक दुसऱ्यांना संधी देऊ. मी डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार म्हणून आलो असलो तरी अध्यक्ष मात्र अमेरिकेचा असणार आहे. सर्वप्रथम आपल्याला बीड ७९ लढायचे आहे असे भिडे यांनी म्हटले आहे. बिडेन यांच्या निवडून येण्याने

भारत-अमेरिका यांच्यातील पर राष्ट्रीय संबंध सौहार्दचेच राहणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी केले आहे. जॉन एफ केनेडी यांच्यानंतरचे  बिडेन हे दुसरे कॅथलिक  पंथाचे अध्यक्ष आहेत. बिडे निवडून यावेत म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी घडणूक विहर रचना केली होती.2016 मध्ये टिक पक्षाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभूत झाल्या त्यावेळी  ओबामा अतिशय नाराज झाले होते , हिलेरी क्लिंटन च्या पराभवाचा बदला आपण घेतला असे ओबामा यांना वाटत आहे. तेरी की सरांनी यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे."अमेरिकन्स फॉर अमेरिका"  हा २०१६च्या निवडणुकीत ट्रम्प यांनी दिलेला नारा याही वेळेस दिला होता ,पण तों चालला नाही.

लेखक हे जेष्ठ पत्रकार असून राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad