जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचा पुढाकार
देवानंद जाधव । ९८ ८१ १३९ १२६
यवतमाळ: प्रशासकीय आणि सामाजिक ऊत्तरदाईत्वाची जाणीव जागृत ठेऊन, समाजात रक्ताचं नातं निर्माण करण्याची,पंचक्रोशीतील तमाम जनतेला प्रेरणा देणारा एक आशादायी कार्यक्रम तालुक्यातील मडकोना गावात नुकताच संपन्न झाला. जिल्हाधीकारी एम.डी. सिंह यांच्या निर्देशानुसार कर्तव्यदक्ष तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी महाराजस्व अभियाना अंतर्गत विस्तारीत समाधान शिबीराचे आयोजन केले. अप्पर जिल्हाधिकारी सुनिल महिंद्रकर यांचे अध्यक्षेत आणि उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या ऊपस्थीतीत, पार पडलेल्या या बहुआयामी कार्यक्रमात परिसरातील जनतेच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य ऊमटले. शोषित पिडीत आणि समाजातील गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्यासाठी आयोजीत कार्यक्रमातएका छताखालीच दोनचार डझन सुविधांचे नानाविध प्रमाणपञ वितरित करण्यात आले.
जात प्रमाणपत्र, नाॅनक्रिमीलेयर, अधीवास, ऊत्पन दाखला, शरीराने थकलेल्या आणि डोळ्याने साथ सोडलेल्या निराधार मायबापांना आवश्यक प्रमाणपञाची जाग्यावर पुर्तता करण्यात आली. या शिवाय शिधापञीका, पोकरा योजनेच्या माध्यमातून पाॅली हाऊस, ठिबक सिंचन संच, स्प्रिंकलर संच, आदी साहीत्य वितरित करण्यात आले. ग्रामपंचायत मडकोना अंतर्गत जन्म प्रमाणपञही देण्यात आले. १०० टक्के कर भरुन विकासात हातभार लावणाऱ्या तब्बल पंधरा परिवाराला वाॅटर कॅन आणि, कचरा कुडी देऊन, स्वच्छ भारत मिशनचा संदेश देण्यात आला. राज्य शासनाच्या लक्ष्मीमुक्ती योजने अंतर्गत, माय मावल्यांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने पाच भूमिपुत्रांच्या सातबाऱ्यावर त्यांच्या सहमतीने कपाळावरील कुंकूची नोंद करुन सात बारा दिल्या गेला. तळेगाव, मडकोना, कार्ली, रस्ता दळनवळनासाठी खुला केला. लोणी, वाटखेड, सुकळी, येथील परलोक प्रवासाला निघुन गेलेल्याःच्या वारसांना एक लाख रुपयाचा धनादेश ऐन दिवाळीच्या तोंडावर देण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत चार शेतकरी मायबापांना कर्जमुक्ती दाखला देण्यात आला. भाकरी साठी धावाधाव करुन घाम गाळुन रक्त आटवणा-या मडकोना च्या नागरीकांनी रक्तदान केले. त्यामध्ये तहसीलदार कुणाल झाल्टे यांचे महसुल कर्मचारी देखील पुढे सरसावले. याच कार्यक्रमात रिलायन्स समुहाने विविध स्टाॅल लाऊन अनेक योजनांची माहिती देत जनजागृती करुन एक आगळा वेगळा संदेश दिला. समस्या मुक्ती संस्थेने स्टाॅल लाऊन आर्सेनिक अलबम वितरीत करुन रक्त तपासणी केली. ग्रामपंचायत मडकोनाने गांडुळ खताची ना नफा ना तोटा या धर्तीवर विक्री केली. अन्नपुर्णा महीला बचत गटाद्वारा निर्मित मास्क, कापडी पिशवी, सॅनीटरी नॅपकीन कागदी पिशवी, अशा विविध वस्तूंचा स्टाॅल ऊभा करुन हम भी कुछ कम नही हा संदेश पंचक्रोशीतील पेरला. कृषी विभाग, आरोग्य विभाग यांचे कार्य देखील डोळ्यात भरणारे आहे. अशा अथांग अंतकरणाच्या लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली केले. गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक, तालुका आरोग्य अधिकारी यांचे सह शेकडो मान्यवर ऊपस्थीत होते. एकंदरीतच यवतमाळच्या तहसील मधुन राज्यभर रक्तदानाचा संदेश गेला. एवढे मात्र नक्की.
