Breaking

Post Top Ad

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

तूर-चना अनुदान रकमेबाबत शेतकऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन

तूर-चना अनुदान रकमेबाबत शेतकऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन
यवतमाळ: सन २०१७-१८ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत तूर व चना खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. परंतु धान्य खरेदी करण्याकरीता एसएमएस देण्यात आले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानाची रक्कम जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहे. यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन पध्तीने वर्ग करण्यात आली आहे.

मात्र काही शेतकऱ्यांचे बँक खाते बंद असून काही खाते आधार लिंक नाही. तसेच काही शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक बदलले असून इतर तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांशी संपर्क होऊ शकत नाही. अशा शेतकऱ्यांनी दि. १३ नोव्हेंबरपर्यंत खरेदी केंद्रावर संपर्क करावा व आपले आधारकार्ड आणि बँक पासबुकची सत्यप्रत खरेदी केंद्रावर सादर करावी. अन्यथा अनुदानाची रक्कम शासनास परत करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad