Basaveshwar Jayanti : शिवा महिला आघाडीच्या वतीने रविवारी नागपुरात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य उत्सव !

 

नागपुरातील शिवा महिला आघाडीतर्फे १७ मे रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

 नागपूर : शिवा संघटना आणि शिवा महिला आघाडी नागपूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा अंतर्गत आयोजित हा कार्यक्रम रविवार, १७ मे २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता गजानन नगर, हिंगणा रोड येथे संपन्न होणार आहे.

बाराव्या शतकात समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे वीरशैव-लिंगायत धर्माचे महान प्रचारक व प्रसारक म्हणून महात्मा बसवेश्वर यांची ओळख आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार समाजातील नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभयराव कल्लावार हे राहणार आहेत. विदर्भातील सामाजिक आणि संघटनात्मक कार्यामुळे त्यांना ‘विदर्भाची धडकन’ म्हणूनही ओळखले जाते. कार्यक्रमाचे उद्घाटन सचिव, मॅडम माँटेसरी असो, वीरशैव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सौ. विजयश्री मुकुंदराव ठोंबरे यांच्या हस्ते होणार आहे.  

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त न्यायाधीश प्रभाकरराव मार्कंड्येवार,आरटीओ ईंस्पेक्टर अर्चना अमेय आडके(घाणेगावकर) प्राचार्य नितीन तुपेकर, नगरसेविका अश्विनी अंबादे, पूर्व विदर्भ विभाग अध्यक्षमा. गजानन बाजारे, पूर्व विदर्भ विभागिय संघटक अनिल तंबाखे, शिवा महिला आघाडी नागपूर महानगर अघ्यक्षा श्रीमती सुकन्या थडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जयंती उत्सवाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर यांच्या समतेच्या विचारांचा जागर, सामाजिक ऐक्य आणि समाज प्रबोधनाचा संदेश देण्यात येणार असून या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे . वीरशैव-लिंगायत समाजासह समता प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन वच्छला हरगोले, गीता पाठक, मुक्ता लोथे, सुनिता घुरडे, सरला आवारे आणि सुरेखा मेनकुदळे यांनी केले आहे.

°°°°°




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने