संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका ही एक चूक !

अन्यथा नष्ट होऊ शकते तुमची सर्व पुण्याई

मकर संक्रांती २०२६ हा पवित्र सण १४ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. या दिवशी काही निषिद्ध कृती केल्यास मिळणारे पुण्य नष्ट होऊ शकते, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते.

मुंबई : मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असून तो १४ जानेवारी २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्य आपल्या पुत्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य आणि शनी यांच्यातील विशेष नात्यामुळे मकर संक्रांतीला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व दिले जाते. याच काळात शुक्र ग्रहाचाही उदय होतो, त्यामुळे शुभ आणि मंगल कार्यांना प्रारंभ करण्यासाठी हा कालखंड अनुकूल मानला जातो.

धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पुण्यकर्म केल्यास विशेष फळ प्राप्त होते. गंगा किंवा पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापांचा नाश होतो, असे सांगितले जाते. मात्र, ज्योतिषतज्ज्ञांच्या मते या दिवशी काही गोष्टी टाळल्या नाहीत, तर मिळालेली सर्व पुण्याई नष्ट होण्याची शक्यता असते.

मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठताच अन्नग्रहण करू नये. प्रथम स्नान करून दान केल्यानंतरच भोजन करावे, असे धार्मिक संकेत आहेत. विशेषतः गंगास्नानाचे महत्त्व सांगितले जाते, त्यामुळे शक्य असल्यास स्नानानंतरच काही खाणे-पिणे करावे.

या दिवशी घरामध्ये लसूण, कांदा, मांसाहार तसेच तामसिक पदार्थांचे सेवन पूर्णतः वर्ज्य मानले जाते. घरातील प्रत्येक सदस्याने सात्त्विक आहार घ्यावा आणि घरातील पवित्रता व सकारात्मकता जपावी, असे मानले जाते.

मकर संक्रांती हा सण निसर्गाशी जोडलेला असल्याने या दिवशी झाडांची कत्तल, छाटणी किंवा कोणत्याही प्रकारे झाडांना इजा पोहोचवू नये. धार्मिक मान्यतेनुसार ही एक मोठी चूक मानली जाते आणि त्यामुळे सर्व पुण्य नष्ट होऊ शकते, असे सांगितले जाते.

या दिवशी जर घरी साधू-संत, वृद्ध व्यक्ती किंवा गरजू लोक आले, तर त्यांच्याशी उद्धटपणे वागू नये. कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवू नये. आपल्या क्षमतेनुसार अन्न, तिळ, गूळ, घी, गरम कपडे किंवा धनाचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी क्रोध, कटु शब्द, भांडण-तंटे किंवा वादविवाद टाळावेत. वाणीवर नियंत्रण ठेवून सर्वांशी प्रेमाने आणि सौहार्दाने वागावे. या दिवशी मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारच्या नशेपासून पूर्णतः दूर राहणे आवश्यक मानले जाते. तसेच अतितिखट, तेलकट पदार्थ टाळून तिळ, मूगडाळीची खिचडी यांसारखे सात्त्विक भोजन करावे, असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे.


---------






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने