जेवणाच्या सवयींमुळे घरात ओढवू शकतात अडचणी !


वास्तुशास्त्रानुसार जेवताना केल्या जाणाऱ्या काही छोट्या चुकांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. जेवणाची दिशा, स्वयंपाक घराची रचना आणि थाळीचे नियम जाणून घ्या.

वास्तुशास्त्रात स्वयपाघर आणि जेवण करण्याच्या पद्धतींना अत्यंत महत्त्व दिले जाते. रोजच्या जीवनात अगदी साध्या वाटणाऱ्या सवयी, जसे की जेवताना बसण्याची दिशा, टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवणे, अथवा स्वयंपाघराची चुकीची रचना, या सर्व गोष्टी घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करू शकतात. वास्तुनुसार या छोट्या चुका दीर्घकाळ दुर्लक्षित केल्यास आरोग्य बिघडणे, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते.

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाघर किंवा रसोईघराची योग्य दिशा ही आग्नेय म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशा मानली जाते. ही अग्नी तत्वाची दिशा असल्यामुळे येथे बनवलेले अन्न ऊर्जादायी आणि शुभ मानले जाते. स्वयंपाक करताना व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असावे, असे सांगितले जाते. यामुळे अन्नात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. काही तज्ज्ञ उत्तर-पूर्व दिशेतील स्वयंपाक चांगला मानतात, मात्र दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेत रसोई असणे अशुभ मानले जाते.

जेवण करतानाही दिशेला विशेष महत्त्व आहे. पूर्व दिशेकडे तोंड करून जेवणे सर्वोत्तम मानले जाते, कारण यामुळे सूर्यऊर्जा शरीराला मिळते आणि मन प्रसन्न राहते. उत्तर दिशेकडे तोंड करून जेवणेही लाभदायक समजले जाते, कारण ही कुबेराची दिशा आहे. मात्र दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवू नये, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, असे वास्तुशास्त्र सांगते. पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवणे सामान्य मानले जाते, मात्र त्यातून विशेष लाभ होत नाहीत.

जेवणाच्या थाळीशी संबंधित काही नियमही वास्तुशास्त्रात नमूद आहेत. थाळीत सर्वप्रथम भाकरी किंवा भात वाढावा, कारण धान्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. मीठ थाळीच्या उजव्या बाजूला आणि लोणचे डाव्या बाजूला ठेवणे योग्य समजले जाते. जेवणासाठी स्टील किंवा कांस्याच्या भांड्यांचा वापर शुभ मानला जातो.

जेवताना मन शांत ठेवणे फार महत्त्वाचे आहे. टीव्ही पाहत किंवा मोबाईल वापरत जेवणे टाळावे, कारण त्यामुळे अन्नातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, असा समज आहे. उरलेले अन्न वाया घालवू नये, तर शक्य असल्यास पक्षी किंवा गरजू लोकांना द्यावे. वास्तुशास्त्रानुसार अन्नाचा सन्मान केल्यास घरात समृद्धी आणि शांतता नांदते.

----------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने