शुक्रवारी राजकीय भूकंप होऊन मराठी पंतप्रधान बनणार?

 

prithviraj-chavan-pm-change-prediction-december-19-nagpur-bjp-marathi-prime-minister

पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळपुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. शुक्रवार 19 डिसेंबर रोजी भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होईल आणि देशाचा पंतप्रधान बदलू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होऊ शकतो असे संकेत त्यांनी दिले आहेत.


पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या रकीय अंकगणितानुसार काँग्रेस, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतील कोणालाही पंतप्रधान होण्याची संधी नाही, कारण केंद्रात त्यांची संख्या अपुरी आहे. 

त्यामुळे जर काही अनपेक्षित घडामोडी घडल्या, तर भाजपमधीलच एखादा नेता पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊ शकतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपूरच्या भाजप नेत्यांकडे सूचकपणे बोट दाखवले. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले शहर असून, येथून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव असलेले नेते भाजपमध्ये सक्रिय आहेत, याकडे त्यांनी अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले.या वक्तव्यामागे जागतिक घडामोडींचे संदर्भ असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. 

अमेरिकेत कुख्यात उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे ‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’अंतर्गत 19 डिसेंबर 2025 पर्यंत जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कागदपत्रांमधून जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अमेरिकेतील या घडामोडींचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू शकतात आणि त्याचा परिणाम भारताच्या राजकारणावरही होऊ शकतो, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार एपस्टीन प्रकरणात भारत सरकार किंवा कोणत्याही भारतीय अधिकाऱ्यांवर थेट गुन्हेगारी आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. काही ई-मेल संवादांमध्ये भारतीय नेत्यांची आणि उद्योगपतींची नावे केवळ संपर्क किंवा भेटींच्या संदर्भात आढळली आहेत. 

तरीही या प्रकरणामुळे देशात तर्क-वितर्कांना उधाण आले असून, 19 डिसेंबरकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.भाजपकडून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे दावे फेटाळून लावले असले, तरी चव्हाण आपल्या भाकितावर ठाम आहेत. याआधीही त्यांनी पीएमओमध्ये दीर्घकाळ काम केल्याचा अनुभव आणि दिल्लीतील संपर्कांचा उल्लेख करत अशा घडामोडी शक्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 19 डिसेंबर रोजी नेमके काय घडणार, पंतप्रधानपदाबाबत कोणतेही मोठे निर्णय होणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे.

---------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने