वंशाचे ज़ोहरान ममदानी बनले न्यूयॉर्कचे नवे महापौर;
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शहरात झालेल्या मेयरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे ज़ोहरान ममदानी (Zohran Mamdani) यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून ममदानींना लक्ष्य करत अनेक टीका आणि धमक्या दिल्या होत्या, तरीही ममदानींनी डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पार्टीच्या उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
या निवडणुकीत ममदानींचा मुकाबला अपक्ष उमेदवार आणि माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो तसेच रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लीवा यांच्याशी होता. डोनाल्ड ट्रम्पनंतरच्या काळातील ही एक महत्त्वाची राजकीय परीक्षा मानली जात होती. पण ट्रम्पच्या प्रचारातील आरोप आणि विरोध झुगारून ममदानींनी मतदारांच्या मनात विश्वास जिंकला आणि न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात आपले नाव कोरले.
न्यूयॉर्क शहराच्या निवडणूक मंडळानुसार, या वेळी तब्बल 20 लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केले.ही आकडेवारी 1969 नंतरची सर्वाधिक मतदानाची नोंद आहे.
शहराची एकूण लोकसंख्या सुमारे 85 लाख आहे.
या विक्रमी मतदानामुळे न्यूयॉर्कच्या श्रीमंत व प्रभावशाली वर्गात खळबळ माजली असून, ट्रम्प समर्थक गट स्पष्टपणे बचावात्मक भूमिकेत आला आहे.
34 वर्षीय ज़ोहरान ममदानी यांनी आर्थिक असमानता दूर करण्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी धोरणात्मक बदलांची घोषणा केली होती. त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी दृष्टिकोनामुळे हजारो युवक मतदार त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांना वर्माँटचे सिनेटर बर्नी सँडर्स आणि न्यूयॉर्कच्या काँग्रेस सदस्या अलेक्झांड्रिया ओकासिओ- कोर्टेज यांचंही थेट समर्थन मिळालं.
ममदानी यांनी आपल्या प्रचार मोहिमेत “शहर प्रत्येकासाठी असावं केवळ श्रीमंतांसाठी नाही.”असं ठामपणे सांगितलं होतं. ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी यांनीही प्रचार मोहिमेत सक्रिय भूमिका निभावली. निवडणुकीच्या दिवशी त्यांनी ॲपस्टोरिया, क्वीन्स येथे मतदान करताना समाज माध्यमावर स्टोरी शेअर केली आणि “आज आम्ही इतिहास घडवतोय,” असं भावनिक विधान केलं.
ब्रुकलिनमधील पॅरामाउंट थिएटरच्या बाहेर ममदानींच्या विजय सोहळ्यासाठी हजारो समर्थक जमले.बीबीसीच्या माहितीनुसार, संगीत कार्यक्रम, भाषणं आणि उत्साहात भरलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
माध्यम प्रतिनिधी आणि चाहत्यांनी बराच वेळ रांगेत उभं राहून हा ऐतिहासिक क्षण अनुभवला
या निवडणुकांमध्ये अमेरिकेच्या अनेक भागांत डेमोक्रॅटिक उमेदवारांनी विजय मिळवला. मिकी शेरिल न्यू जर्सीच्या राज्यपाल पदावर विजय, एबिगेल स्पॅनबर्गर वर्जिनियाच्या राज्यपाल पदावर विजय आफताब पुरवाल – सिनसिनाटीचे नवे महापौर
