महाराष्ट्र24 । आर्णी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार सर्कल आहेत.त्या पैकी जवळा- लोणी सर्कलची जोरदार चर्चा सुरू आहेत. पंचायत समितीचे सदस्य अनुप जाधव आणि त्यांचे वडिल राजेंद्र जाधव यांनी निवडणूक तोंडावर असतांना मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरू केली आहे. दररोज पन्नास,साठ गाड्या सोबत घेऊन गावा-गावात जोरदार एण्ट्री करित असल्याने विविध चर्चेला उधान आले आहे.
राजेंद्र जाधव काही महिन्यांपूर्वी पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते शिवसेनेकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केल्याची माहिती आहे. राजेंद्र जाधव तसे शांत आणि संयमी व्यक्तीमहत्व म्हणुन सर्वांना परिचित आहे. जवळा- लोणी जिल्हा परिषद मतदारसंघात तसा त्यांचा मोठा नेटवर्क देखील आहेत. मात्र सर्कल मध्ये दररोज दौरा करित असल्याने शिवसेनेत दोन गट पडल्याचे बोलल्या जात आहे. यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रविण शिंदे हे सध्यातरी पिछाडीवर असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.
जवळा-लोणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक यावर्षी रंगतदार होणार असल्याने सर्वच आतापासूनच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. माजी पंचायत समिती सभापती राजीव विरखेडे, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र राठोड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रविण शिंदे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आर्णीचे प्रथम नगराध्यक्ष आणि खेडचे सुपुत्र अनिल आडेंनी सुद्धा जवळा-लोणी जिल्हा परिषद सर्कल मधून तयारी सुरू केल्याची माहिती आहे.मात्र इच्छुकांना पक्ष उमेदवारी देणार का हे देखील महत्वाचं राहणार आहे. एकंदरीत शिवसेने कडून बाप-लेक जोरदार कामाला लागल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.